Pune Suicide Case : भयंकर घटना! कोकण कड्यावर तलाठी अन् अल्पवयीन मुलीचा मृतदेह; १२०० फूट खोल दरीत…

जुन्नर : कधी कोणाला कसा मृत्यू येईल आणि त्याचे परिणाम काय असतील हे सांगता येत नाही. अशातच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तलाठी आणि एका मुलीचा मृतदेह खोल दरीत आडला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. असं असलं तरी दोघांच्याही मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोकण कड्याहून साधारण १२०० फूट खोल दरीत हे दोन्ही मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एक तलाठी आणि एका मुलीचा मृतदेह दरीत आढळला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पुण्याच्या जुन्नरमध्ये हे दोन्ही मृतदेह आढळून आले आहेत. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी स्वत:चं आयुष्य संपवलं असा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. त्यांच्या कथित आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत पुरुष हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत होता. रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) असं या मृत तलाठ्याचं नाव आहे. तर या तलाठ्यासोबत ज्या मुलीचा मृतदेह आढळला आहे ती जुन्नरमधीलच रहिवासी आहे.




 

कोकण कड्यावर ३-४ दिवस उभी होती गाडी


हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते. संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं बोललं जातंय. ती रामचंद्र यांची नात्यातील होती. अशातच रामचंद्र यांची गाडी ३-४ दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी असल्याचे तेथील ग्रामस्थांना दिसले. तसेच याच गाडीजवळ पायातील चपलांचा जोड आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला होता.



मुलीचा मृतदेह १२०० फुटांवर


त्यानंतर कोकण कड्याच्या खोल दरीत शोध घेण्यात आला. या शोधानंतर सुमारे १२०० फुटावर मृतदेह दोन आढळले आहेत. याबाबत जुन्नर पोलिसांना कळविण्यात आले आहे. जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या १६ जणांच्या पथकाने दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले आहेत. यात मुलीचा मृतदेह १२०० फुटांवर, तर रामचंद्र यांचा मृतदेह १३५० फुटांवर सापडला.



दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज


दरम्यान, मुलीचं अपहरण झाले असल्याची तक्रार नातेवाईकांनी १५ जून रोजी जुन्नर पोलिसांकडे केली होती. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत होते. एकीकडे पोलीस तपास करत असताना दुसरीकडे या दोघांचेही मृतदेह दरीत आढळले आहेत. या दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मात्र पोलीस सर्व बाबी पडताळण्याचे काम करत आहेत.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात