भारतीय कसोटी क्रिकेट संघाने पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला का बांधली काळी पट्टी ?

लीड्स : लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. या सामन्यात पाच दिवसांत तीन वेळा भारतीय क्रिकेट संघाने खांद्याला काळी पट्टी बांधलेली दिसली. तीन वेगवेगळ्या कारणांसाठी पाच दिवसांत तीन वेळा भारतीय क्रिकेट संघाने खांद्याला काळी पट्टी बांधली. भारतीय संघासोबतच इंग्लंडच्या क्रिकेट संघानेही पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला काळी पट्टी बांधली. खेळाडूंच्या या कृतीचे कारण समोर आले आहे.

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात भारतीयांसह परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये ५० पेक्षा जास्त इंग्लंडचे नागरिक होते. या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करण्यासाठी भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघाने लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी खांद्याला काळी पट्टी बांधली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेनेस यांच्या निधनाची माहिती मिळाली म्हणून भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी खांद्याला काळी पट्टी बांधली. यानंतर सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताचे माजी गोलंदाज दिलीप दोशी यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली म्हणून भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी खांद्याला काळी पट्टी बांधली. या पद्धतीने भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी लीड्स कसोटीत पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला काळी पट्टी बांधली.



लीड्स कसोटी, पाचव्या दिवशी उपहारापर्यंत

भारत
पहिला डाव सर्वबाद ४७१ धावा
दुसरा डाव सर्वबाद ३६४ धावा

इंग्लंड
पहिला डाव सर्वबाद ४६५ धावा
दुसरा डाव बिनबाद ११७ धावा (उपहाराला खेळ थांबला)

इंग्लंडला विजयासाठी हव्या २५४ धावा
भारताला विजयासाठी हव्या दहा विकेट

 
Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या