Hindi Language : हिंदी भाषा सक्तीवर सरकारची तुर्तास स्थगिती, राज्य सरकारची नेमकी भूमिका काय ?

  94

मुंबई : राज्यात हिंदी तिसरी भाषा अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायाला मिळाली होती. राज्य सरकारकडून हिंदी भाषेसाठी सकारात्मक भूमिका घेण्यात आली होती. परंतू मराठी भाषेची अस्मिता धोक्यात येणार असल्याची भीती महाराष्ट्रातील जनतेने व्यक्त केली. त्यामुळे राज्य सरकारने मराठी जनतेचा वाढता विरोध पाहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या भाषेला तुर्तास स्थगिती दिली आहे. पहिली ते पाचवीपर्यंत सर्वच शाळांमध्ये तिसरी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.


आज सकाळी मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पाडली, या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण विभागातील अधिकारी, राज्याचे शिक्षणमंत्री दादा भूसे या  बैठकीत उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाषा तज्ज्ञ, मराठी भाषा साहित्यीक यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.  असे फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे भाषिक संवेदना वाढली आहे. त्यामुळे अचानक तिसऱ्या भाषेचा पर्याय समोर आला.


राज्य सरकारकडून हिंदी भाषा सक्ती करण्याची शक्यता आहे. राज्यात प्रशासकीय पातळीवर हिंदीचा वाढता प्रभाव पाहून भाषा लादली जात आहे. अशी मराठी जनतेकडून भावना व्यक्त केली जातं आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अॅकडेमिक नवीन शिक्षण धोरणांतर्गत बँक क्रेडिटच्या अनुषंगाने चुका होऊ नयेत, यासाठी इतर पर्यायांवर सर्वांसाठी सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मराठी साहित्यीक आणि भाषा तज्ज्ञ नेमकी काय भूमिक मांडणार आहेत ती आपण लक्षात घेतली पाहिजे असे देखील फडणवीस म्हणाले. मात्र, आता सरकारच्या नव्या शासन निर्णयात (जीआर) हिंदी “सामान्यपणे तिसरी भाषा” असेल, असे नमूद केलं होतं. त्यामुळे हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी देण्यात आलेली तूर्तास स्थगितीला राज्य सरकार पुढे काय निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे.








.



Comments
Add Comment

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला हिरवा कंदील

राज्य सरकारच्या पायाभूत समितीची मंजुरी पुणे : बहुप्रतिक्षित पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या

विश्वास नांगरे पाटील यांनी शेअर केले शालेय प्रगतीपुस्तक, गुण पाहून व्हाल अचंबित

मुंबई: विश्वास नांगरे पाटील यांनी शालेय जीवनातील इयता आठवीचे प्रगतीपुस्तक सोशल मिडियावर शेअर केले आहे. वार्षिक

बैलपोळानिमित्त बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जालना: राज्यात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलपोळा

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

भररस्त्यात हातात चाकू घेऊन मास्क मॅनची दहशत ! नागरिक भयभीत

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या समस्या वाढत आहेत . एकामागोमाग एक अशा गुन्हेगारी घटना पुण्यात घडत असतात .

पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला !

पुणे : पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीवरून पेटलेला वाद आता अखेर मिटला आहे . काही मंडळांनी मानाच्या गणपतीच्या