वारीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अबू आझमी यांनी मागितली माफी

मुंबई: वारी संदर्भात केलेल्या वादग्रस्त (Abu Azmi Wari Controversy) वक्तव्यानंतर, अबू आझमी यांना आपली चूक लक्षात आली आहे.  "माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. मी माफी मागतो." असे ट्विट करत त्यांनी आपला माफीनामा जाहीर केला आहे.


महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आझमी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. भाजपसह इतर पक्षांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अबू आझमींना सेक्शन दहा प्रमाणे नोटीस बजावत कारवाईचा इशारा देखील दिला होता. ज्यामुळे हे प्रकरण अंगलट येईल या भीतीने, आता अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज पसरवण्यात आले. माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवले गेले. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. मी त्यांची जाहीर माफी मागतो. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, असे आझमी यांनी म्हटले आहे.


"मी नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सुफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. वारीची परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे. मी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या आणि त्यांच्या हक्कांच्या संदर्भात केला होता. मी कोणत्याही प्रकारची तुलना केली नव्हती. माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी तसे म्हटले होते. अल्पसंख्याक समुदायाच्या मनात या देशात वेगवेगळे कायदे आहेत, अशी भावना निर्माण होऊ नये, हा माझा हेतू होता, असे आझमी यांनी म्हटले.



काय म्हणाले होते अबू आझमी?


अबू आझमी यांनी नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची तुलना वारीशी केली, ज्यात ते म्हंटले की, "आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते असे अबू आझमी म्हणाले होते.

Comments
Add Comment

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यास विरोध

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी

कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून विठुरायाचे २४ तास दर्शन

सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'चा नवा रेकॉर्ड, तब्बल इतके लाख दुधाची विक्री

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर