Sangli Crime : 'नीट' परीक्षेत कमी मार्क पडल्याने पोटच्या लेकीला बापाने टाकलं मारून!

सांगली : सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बारावीत शिकणाऱ्या मुलीला नीट परीक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून माध्यमिक शाळेत मुख्यध्यापक असणाऱ्या वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण करत संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली. याप्रकरणी धोंडीराम भोसले या पित्यास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. परीक्षेत कमी गुण कसे पडले? म्हणत धोंडिराम यांनी रागाच्या भरात हा प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे.


लाकडी खुंट्याने मारहाण


आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे साधना भोसले ही विज्ञान शाखेत शिकत होती . नेलकरंजी गावातच खाजगी शिक्षण संस्थेत वडील धोंडीराम भोसले हे मुख्यध्यापक आहेत .बारावीच्या चाचणी परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले. नीट परीक्षेत कमी गुण का मिळाले? असे विचारात माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याध्यपक असलेल्या पित्याने मुलीला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली. या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सांगली जिल्ह्यात घडली. हे कळताच धोंडीराम भोसले प्रचंड संतापले. बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले ? म्हणत धोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात साधनाला लाकडी खुंट्याने मारहाण केली. या मारहाणीत साधना ही गंभीर जखमी झाली. मारहाणीमुळे तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ९.३०च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रविवारी वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे .


डॉक्टर बनण्याचं स्वप्न


साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. तिचा नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यक धोंडीराम भोसले हे संतापले होते. साधना ही आपटपाडीमधील विद्यालयात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती. त्यावेळी नीट परिक्षेच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला मुख्यापध्यापक पित्याने जात्याच्या लाकडी खुंट्याने रात्री बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाले होती. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसर्‍या दिवशी सकाळी ते योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. साधना ही हुशार होती. तिला दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळाले होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु केवळ नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडूनच झालेल्या मारहाणीत तिचा हकनाक बळी गेलाय.

 
Comments
Add Comment

पुणे मेट्रोचा विस्तार ठरला; विमानतळापर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल नवा मार्ग

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे.

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला