पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे

भाजपा खासदार मेधा कुलकर्णींची मागणी


पुणे : पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं. या रेल्वे स्थानकाचं नुतनीकरण करताना परिसरात पुण्याचा इतिहास दिसावा, अशी मागणी भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी होत आहे.



मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पुणे रेल्वे स्थानकाचं नुतनीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच हे रेल्वेस्थानक पाहताना किंवा रेल्वेस्थानकाचा परिसर पाहताना तिथे कुठेही पुण्याचं अथवा पुण्याच्या देदीप्यमान इतिहासाचं प्रतिबिंब दिसत नाही. त्यामुळे या रेल्वेस्थानकाचं नुतनीकरण करताना पुण्याचा इतिहास प्रतिबिंबित होईल याची काळजी घ्यावी. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील अशीच संकल्पना आहे.”


भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार पुढे म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी यांची संकल्पना आहे की देशातील रेल्वेस्थानकं, विमानतळं अशी असली पाहिजेत की तिथे त्या शहराच्या, आपल्या देशाच्या इतिहासाचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. तेच आता पुण्यातही व्हायला हवं. पुणे रेल्वे स्थानकाचं नुतनीकरण करताना स्थानक परिसरात पुण्याच्या इतिहासाचं प्रतिबिंब दिसावं. प्रामुख्याने पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं अशी मागणी मी केली आहे”.


थोरले बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार केला. त्यांनी हिंदवी स्वराज्याचा कटक ते अटक असा विस्तार केला. त्यांचा शनिवार वाडा हे त्या स्वराज्याचं प्रतीक आहे. पुणे हे त्या स्वराज्याचं केंद्र होतं. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव दिलं जावं, असे मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त

'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक

शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत!

नागपूर : मविआ सरकारच्या काळात संमत झालेला शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत पाठविण्यात आला आहे. शक्ती

रोहित आर्याने विनापरवानगी शाळांकडून पैसे गोळा केले!

नागपूर : पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काऊंटर प्रकरणाची चर्चा मंगळवारी विधानसभेत झाली.

'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर

सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार नागपूर : राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर

शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरे विरोधात हक्कभंग

जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे