राजा रघुवंशी हत्येला नवे वळण : हत्येपूर्वी सुरू केली होती कंपनी

शिलॉन्ग : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे , हत्येच्या आधी दोघांनी मिळून कंपनी सुरू केली होती . राजा रघुवंशीचा भाऊ विपीन रघुवंशीने याचा खुलासा दिला आहे .


राजा रघुवंशीची हत्या होण्याच्या काही दिवस आधी राजा आणि सोनमने एक कंपनी सुरू केली होती, ही कंपनी राजाची आई चुन्नी देवी यांच्या नावावर होती. या घटनेआधी कंपनीच्या खात्यात ७ ते ८ लाख रुपये जमा झाले होते . हे जमा झालेले पैसे सोनमने हत्येची सुपारी देण्यासाठी केला आहे असा आरोप विपीनने केला आहे.



हत्येचा कट कधी रचला ?


विपीनच्या सांगण्यावरून , राजा आणि सोनम हानिमूनला जाण्यापूर्वी सोनमने तिचे तीन साथीदार विकास, आकाश आणि आनंद यांना पैसे दिले होते, जे बहुधा त्या कंपनीच्या खात्यातून काढले गेले असावे. त्यामुळे, संपूर्ण हत्येचा कट आधीच रचलेला होता, असा विश्वास राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. आता रघुवंशी कुटुंबीय आरोपींच्या नार्को टेस्टसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.



आठव्या आरोपीचा शोध सुरू


या प्रकरणात आता आठव्या आरोपीचे नाव लोकेंद्र तोमर समोर आले आहे. शिलॉन्ग पोलिस लोकेंद्र तोमरच्या शोधात आहेत, कारण सोनमने फरार असताना इंदूरच्या देवास नाका परिसरातील फ्लॅटमध्ये त्याच्याकडे आसरा घेतला होता. प्रॉपर्टी ब्रोकर सिलोम जेम्स आणि सिक्युरिटी गार्ड बलवीर अहिरवार यांच्या अटकेनंतर आठव्या आरोपीचा तपास सुरू झाला आहे. सिलोमने चौकशीत कबूल केलं की लोकेंद्र तोमरने त्या फ्लॅटमधून एक काळी बॅग हटवून ती जाळण्याचा दबाव त्याच्यावर टाकला होता. त्या बॅगमध्ये पिस्तूल, रोख रक्कम आणि इतर पुरावे होते. बॅग जाळल्यानंतर पोलिसांनी त्याचे अवशेष जळालेला मोबाइल, प्लास्टिकचे तुकडे इत्यादी जप्त केले आहेत.



आतापर्यंत प्रकरणात मिळालेली माहिती


राजा रघुवंशी याची २३ मे रोजी हत्या करण्यात आली आणि २ जून रोजी त्याचा मृतदेह सापडला. हत्येच्या १७ दिवसांनंतर सोनम पोलिसांसमोर शरण आली, त्यानंतर इतर चार आरोपींनाही अटक करण्यात आली. या हत्येने देशभरात खळबळ उडाली. कुटुंबाला असा संशय आहे की, सोनमने हा गुन्हा एकटीने केला नसेल. पोलीस आता या प्रकरणाकडे केवळ प्रेम प्रकरण किंवा वैयक्तिक शत्रुत्व म्हणून पाहत नाहीत तर यात खोलवरचा कट असण्याची शक्यताही तपासत आहेत. येत्या काळात अलका आणि सोनममधील मैत्रीबाबत धक्कादायक खुलासे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू