मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका! गंभीर आरोप करत 'या' नेत्याने सोडली साथ

"मला जाणूनबुजून पक्षातून डावलले जात होते, माझ्यावर हसत राहिले" केले अनेक आरोप


नागपूर: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीत गुंतलेल्या उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) ना मराठवाड्यातून मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे महत्वाचे शिलेदार डॉ. संजय लाखे पाटील (Dr . Sanjay Lakhe Patil)  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आपला शब्द पाळला नाही, असा आक्षेप लाखे पाटील यांनी घेतला. लाखे पाटील जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. परंतु, शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याचे त्यांनी म्हटले आहे.


संजय पाटील यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा हात सोडून उबाठात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आले. संजय पाटील म्हणाले की, "मला विधानसभा निवडणुकीत सांगलीऐवजी जालना येथून तिकीट देऊ, असे अश्वासन देण्यात आले. परंतु, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यानी त्यांच्या वैयक्तिक अजेंडामुळे तसे होऊ दिले नाही. जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले."


अंबादास दानवेंवर टीका करताना पाटील म्हणाले की, "मला जाणूनबुजून पक्षातून डावलले जात होते. अंबादास दानवे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत होते, तेव्हा मला दौऱ्यापासून दूर ठेवले. कुठलीही जबाबदारी दिली नाही. मुळात मला कामाची संधी दिली नाही. मला कसे दूर ठेवले जाईल, हेच पाहिले गेले. संघटनात्मक कामापासून मला सातत्याने वगळण्यात आले. त्यामुळेच यापुढे मी ठाकरे गटात काम न करण्याचे ठरवले आहे."



राजीनामा पत्रात लाखेने काय लिहिले?


आपल्या राजीनामा पत्रात लाखे पाटील यांनी म्हटले आहे की, अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व निभावत जिंकणारी जालना आपल्याकडे येणार नाही हा तिकडील 'शिष्यत्व धर्म' निभावला. विजयी जागा पदरात पाडून न घेता पक्षाला आणि मला ठेंगा दाखवला... आपल्या डोळ्यासमोर. त्यानंतर आपण मला सचिव पदाची जबाबदारी दिली पण गेल्या 13/14 महिन्यात वेळोवेळी विनंती करूनही कसलीच संघटनात्मक जबाबदारी आपण सोपवली तर नाहीच पण जिल्हा, विभाग, राज्य संघटनेतून मला हळूहळू संपूर्णतः बेदखल करण्यात आले. आपल्या मुखपत्रामध्ये कुठल्याही कार्यक्रमाच्या बातम्यात उपस्थित असूनही इतर सचिवासह माझे नाव येणार नाही ही रचना प्रस्थापित व्यवस्थेने ठरवून केली. आणि वाचून जाणकार मला हसत राहिले.  बातमीत नाव नाही तर पक्षात स्थान नाही असे सांगत राहिले.


Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : सावजी विदर्भाची शान, रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका! - महसूल मंत्री बावनकुळे

मुंढेंच्या ‘सावजी मटण' विधानावर

CEIR Sanchar Saathi : तुमच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहेत? 'संचार साथी' पोर्टलद्वारे 'अशी' करा तपासणी

भारतात दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून डिजिटल

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Naresh Mhaske : 'आधी स्वतःचा पक्ष सांभाळा, मग पतंगबाजी करा'; संजय राऊतांवर नरेश म्हस्केंचा जोरदार हल्लाबोल

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर

Zeeshan Siddiqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पुत्र झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी

परदेशातून 'व्हॉइस नोट'द्वारे धमकीचा संदेश; पोलीस व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा