जम्मूला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंग न करताच दिल्लीला परतले, कारण...

  109

नवी दिल्ली: श्रीनगरला जम्मूमार्गे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान आयएक्स-२५६४ सोमवारी दिल्लीला माघारी परतले. श्रीनगरला जाण्यापूर्वी विमान दुपारी जम्मूमध्ये उतरणार होते. मात्र, काही काळ जम्मू विमानतळावर फिरल्यानंतर वैमानिकाने लँडिंग न करताच दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला. परत जाण्यापूर्वी विमानाने जम्मू हवाई क्षेत्रात अनेक फेऱ्या मारल्या होत्या, दरम्यान हवामान स्वच्छ देखील होते, पण तरीही ते दिल्लीला परतले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमान दुपारी १२ वाजता जम्मू विमानतळावर उतरणार होते, त्यानंतर ते श्रीनगरला रवाना होणार होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान जम्मूत उतरवू शकले नाही.



विमान दिल्लीला परत का आले?


दिल्लीहून जम्मूमार्गे श्रीनगरला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे जम्मू शहरात न उतरताच पुन्हा दिल्लीला वळवण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमान IX-2564 दुपारी जम्मूमध्ये उतरण्याची अपेक्षा होती, परंतु वैमानिकाने दिल्लीला परत जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ते काही वेळ विमानतळावरच घिरट्या घालत राहिले.


दरम्यान, अनेक प्रवाशांचे नातेवाईकही जम्मू विमानतळावर त्यांना घेण्यासाठी आले होते, परंतु नंतर त्यांना निराश होऊन परतावे लागले. दिल्लीला परतल्यानंतर विमानातील प्रवाशांना पर्यायी विमान किंवा मार्गाची वाट पहावी लागली.


आयएएनएसला दिलेल्या निवेदनात, एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, "तांत्रिक समस्येमुळे मूळ विमान दिल्लीला परतल्यानंतर आमच्या दिल्ली-जम्मू उड्डाणासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो."


यापूर्वी, एअर इंडिया एक्सप्रेसच्या दुसऱ्या विमानाबाबतही मोठा गोंधळ उडाला होता, १८० प्रवाशांसह बेंगळुरूहून पाटणाला जाणारे फ्लाइट IX2936 रविवारी सकाळी ८:३० वाजता पोहोचले. त्यानंतर एका दिवसातच ही दुसरी घटना घडली आहे.


प्रवाशांच्या मते, विमान पुन्हा त्याच जागी उतरल्यानंतर, त्यांचे सामान कुठे उपलब्ध असेल याची बॅगेज बेल्ट नंबर नमूद करून घोषणा करण्यात आल्या.मात्र अनेक प्रवाशांना त्यांचे चेक-इन केलेले सामान गहाळ झाल्याचे पाहून धक्काच बसला. विमान उतरल्यानंतर, सर्व प्रवाशांना बेल्ट क्रमांक ४ वरून त्यांचे सामान घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र कोणतेही सामान आले नाही. चौकशी केल्यावर, विमान कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की विमानातील वजनाच्या मर्यादेमुळे सामान भरलेच गेले नाही. या स्पष्टीकरणामुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी विमानतळावर निदर्शने सुरू केली, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. विमानतळावर तैनात असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या ग्राउंड स्टाफ आणि सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्रस्त प्रवाशांना शांत केले.


अहवालात असेही म्हटले आहे की, अनेक प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली,  खास करून ज्यांना कनेक्टिंग फ्लाइट पकडायच्या होत्या, त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरलाइन कर्मचाऱ्यांनी सर्व बाधित प्रवाशांचे संपर्क तपशील गोळा केले आणि त्यांना आश्वासन दिले की त्यांच्या बॅगा त्यांच्या घरी पोहोचवल्या जातील.


Comments
Add Comment

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण