1098 Toll Free Number : आता इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात ‘१०९८’ टोल फ्री क्रमांक! काय प्रकार नक्की? जाणून घ्या...

  58

अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पहिलीच्या अभ्यासक्रमात बालहिताच्या दृष्टीने ‘१०९८’ हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक समाविष्ट केला आहे. या निर्णयामुळे मुलांमध्ये लहान वयातच स्वतःच्या हक्कांविषयी जागरूकता, संकटात मदत घेण्याचा आत्मविश्वास आणि सुरक्षेची भावना रुजवण्याचा प्रयत्न होणार आहे. या क्रमांकाचा उल्लेख पूर्वी इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात होता. मात्र आता तो इयत्ता पहिलीपासूनच शिकवण्यात येणार आहे. लहान वयातच मुलांना सामाजिक सुरक्षा यंत्रणांबद्दलची माहिती मिळावी हा या मागचा उद्देश आहे.



‘१०९८’ म्हणजे?


‘१०९८’ हा बालहक्क संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या आहे. हा क्रमांक २४x७ (संपूर्ण दिवस व रात्र) कार्यरत असतो, आणि भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करतो. हा क्रमांक १८ वर्षांखालील सर्व बालक आणि बालिकांसाठी उपलब्ध आहे. बालविवाह, बालमजुरी, शारीरिक, मानसिक अत्याचार, उपेक्षा, विस्थापन, बेपत्ता होणे किंवा इतर संकटग्रस्त स्थितीत असलेल्या कोणत्याही मुलासाठी या क्रमांकावर त्वरित मदत मिळू शकते.





मदतीसाठी आवाज उठवणे


या क्रमांकाचा अभ्यासक्रमात समावेश करून शालेय वयातच मुलांना “अत्याचार सहन करणे नाही, तर मदतीसाठी आवाज उठवणे” हे शिकवण्याचा अत्यंत सकारात्मक प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे. बालकांमध्ये आत्मविश्वास व जनजागृतीसाठी हा प्रभावी टप्पा मानला जात आहे. मात्र शिक्षक व पालकांनीही या क्रमांकाचे महत्त्व मुलांना समजावून देणे आवश्यक आहे. या माध्यमातून सामाजिक सुरक्षिततेसाठी शिक्षणातून पुढाकार घेण्यात येत आहे. शालेय वयातच मुलांमध्ये कायद्याचा आधार, आत्मभान आणि सामाजिक सुरक्षा यांचा परिचय करून देणे, हा १०९८ क्रमांक अभ्यासक्रमात आणण्याचा उद्देश असल्याचे शिक्षण विभागा कडून सांगण्यात आले शिक्षण हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संरक्षणासाठी वापरण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

Comments
Add Comment

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार