Gold Silver: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढीनंतर सोन्याचांदीत मात्र घसरण ! 'ही' कारणे जबाबदार!

प्रतिनिधी: गुंतवणूकदारांनी आज सोन्यावरील लक्ष हटवून कच्च्या तेलाच्या निर्देशांकावर लक्ष केंद्रित केले आहे. मध्यपूर्वेतील इस्त्राईल व इराण युद्धातील अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे अमेरिकन बाजारात त्याचे पडसाद उमटत बाजारात घसरण झाली होती. भारतीय शेअर बाजारात आज तो ट्रेंड कायम राहिल्याने सेन्सेक्स व निफ्टीत घसरण झाली याच पार्श्वभूमीवर आज सोन्याच्या दरात घटलेल्या मागणीमुळे किंमतीत घसरण पहायला मिळत आहे. 'गुड रिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६ रूपयांची किरकोळ घसरण झाली असल्याने प्रति ग्रॅम किंमत १००६९ रूपयावर पोहोचली आहे. तर २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ६० रूपयाने घसरत १००६९० रूपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम किंमतीत ५ रूपयानी घट झाली असल्याने प्रति ग्रॅम किंमत ९२३० रुपयांवर पोहोचली आहे. तर प्रति तोळा किंमत ५० रूपये घसरत ९२३०० रुपयांवर पोहोचली. १८ कॅरेट सोने प्रति ग्रॅम किंमत ४ रुपयांनी घसरण ७५२२ व रूपयावर पोहोचली आहे. तर प्रति तोळा किंमतीत ४० रुपयाने घसरण झाल्याने किंमत ७५५२० रुपयांवर पोहोचली आहे.


आज जागतिक पातळीवर सोन्याच्या निर्देशांकात सकाळपर्यंत ०.२७% घसरण झाली आहे. गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index)०.३०% घसरला होता. भारतीय कमोडिटी बाजार म्हणजेच एमसीएक्स (Multi Commodity Exc hange MCX) बाजारात सोन्याच्या निर्देशांकात ०.०४% घसरण झाली परिणामी किंमत पातळी ९९०६६ रूपयांवर पोहोचली आहे. आज मुंबई पुण्यासह अनेक महत्वाच्या शहरातील सराफाबाजारात २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत १००६९ रूपये आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील दबावानंतर सोन्याच्या निर्देशांकात घसरण होत आहे. बाजारातील सोन्याच्या मागणीतील झालेली किंमत तसेच अमेरिकन डॉलर वधारला असल्याने त्याचे परिणाम जागतिक सोने व्यापारात होत आहे.


चांदीतही घसरण !


सोन्याच्या मागणीत घट झाल्याबरोबर आज चांदीच्या मागणीतही घट कायम राहिली आहे. चांदीचा मुख्य वापर हा औद्योगिक उत्पादनात होतो मात्र मध्यपूर्वेतील युद्धानंतर कंज्युमर प्रोडक्ट (FMCG) प्रमाणेच सप्लायचेन यंत्रणेवर फटका बसल्याने चांदीही सोन्याप्रमाणे घसरली. तसेच डॉलर मजबूत स्थितीत पोहोचलेल्याने चांदीच्या खरेदीतही घसरण झाली. आज चांदीच्या एमसीएक्सवरील निर्देशांकात मात्र सुरूवातीच्या कलात ०.३२% वाढ झाली आहे त्यामुळे सपोर्ट लेवल राखण्यास चांदीला थोड्याफार प्रमाणात यश आल्याने किंमतीची घसरण मर्यादित राहिली आहे.

Comments
Add Comment

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं