'मम्मी, मी विष प्यायलो आहे, माझा मृतदेह घेऊन जा', पुण्यात १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

पुणे: पुण्यात एका १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक ऑडिओ आणि व्हिडिओदेखील रेकॉर्डिंग केले होते. ज्यामध्ये त्याने म्हंटले होते की "मम्मी, मी माझा मोबाईल फोडून टाकेन. कोणताही पुरावा मिळणार नाही. मला मरायचे आहे. मी विष प्राशन केले आहे. मी तुला लोकेशन पाठवले आहे. तिथून माझा मृतदेह घेऊन जा."


सदर घटना पुण्यातील देहू रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव संजय कुमार विनोदकुमार राजपूत असे आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी,  त्याने नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज देहूरोड पोलिसांनी वर्तवला आहे. 


ही घटना काही दिवसांपूर्वीची असून, दिनांक १७ जून रोजी देहूरोड पोलिस ठाण्यात संजय कुमार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली होती. अखेर शनिवारी त्याचा मृतदेह घोरवडेश्वर टेकडीच्या पायथ्याशी आढळला. मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली आढळली. पोलीस तपासात संजय कुमारने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही तेच म्हटले आहे.



आत्महत्येपूर्वी बनवला व्हिडिओ


संजय कुमार पिंपरी-चिंचवड परिसरात त्याच्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या कुटुंबात त्याचे पालक आणि दोन बहिणी आहेत. संजय कुमारने आत्महत्येपूर्वी ऑडिओ रेकॉर्ड केला होता.  ऊं ऑडिओमध्ये त्याने त्याच्या बहिणींबद्दल चिंता व्यक्त केली आणि पालकांना त्यांना उच्च शिक्षण देण्याची विनंती केली. तसेच आत्महत्येचा एक व्हिडिओ देखील त्याने बनवला, ज्यात त्याने विष प्राशन केल्याचे सांगितले. यामध्ये तो प्रचंड नैराश्यात दिसत होता. आत्महत्या करण्यासाठी त्याने ऑनलाइन विषारी औषध मागवले होते. त्यानंतरच त्याने हे पाऊल उचलले. सध्या पोलीस आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओची चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

मेट्रो मार्ग ४ व ४ए प्रकल्प हे ठाणेकरांसाठी नवे श्वासवायू - परिवहन मंत्री

मुंबई : मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येचे समाधान म्हणून महत्त्वाकांक्षी ठरणारा मेट्रो मार्ग ४ व ४ए

राहुरीत पोलिसांचा मोठा छापा : ३१ लाखांचे अवैध फटाके जप्त

राहुरी : राहुरी तालुक्यातील चिंचोली गावात आज पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना साठवून ठेवलेले फटाके जप्त

Govind Barge case: सोन्याचे दागिने, प्लॉट, बुलेट ते शेतजमीन... तरी तिची भूक भागली नाही, गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!

बीड: गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची

पीएमपीएमएलची पानशेत पर्यटन बससेवा

जंगल सफारीचे विशेष आकर्षण पुणे : पीएमपीएमएलने पुणेकरांच्या आग्रहास्तव पानशेत पर्यटन बससेवा सुरू केली आहे. ही

‘महादेवी’च्या अनुपस्थितीतच नांदणी मठात नवरात्रोत्सव साजरा होणार ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे पाठविण्यासंदर्भात उच्चस्तरीय

हिंदी कवी कुमार अंबुज यांना यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार

नाशिक (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय