विलेपार्ले - अंधेरी पूर्व भागांत पुढील शनिवारपर्यंत पाणीकपात

मुंबई : मुंबई मेट्रो-७ अ प्रकल्प अंतर्गत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे अर्थात एमएमआरडीएच्यावतीने, के पूर्व प्रभागातील अंधेरी पूर्व बामणवाडा जवळ, वेरावली जलाशयाच्या (२४ x ७) कार्यान्वित असलेल्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या निगमवाहिनीखाली बोगदा खणन संयंत्राद्वारे खोदकाम करण्यात
येणार आहे.


हे खोदकाम रविवारी २२ जून २०२५ पासून शनिवारी २८ जून २०२५ या कालावधीत सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० पर्यंत आणि रात्री ९.३० ते मध्यरात्री नंतर ३.३० वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे के पूर्व विभागातील अर्थात विलेपार्ले ते अंधेरी पूर्व या विभागांतील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी या संबंधित भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्या भागांत पाणीकपातीचा कसा असेल परिणाम


विलेपार्ले (पूर्व) - सायंकाळी ५.०० ते रात्री ८.०० वाजेदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा
जुना नागरदास मार्ग, नवीन नागरदास मार्ग, मोगरापाडा, अंधेरी-कुर्ला मार्ग (अंधेरी स्थानक ते पश्चिम द्रुतगती मार्ग) रात्री ८.०० ते ९.३० वाजेदरम्यान कमी
दाबाने पाणीपुरवठा

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती