Pankaja Munde : स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 'माझी वसुंधरा' अभियान ६.० राबविणार - मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे. राज्यस्तरावर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्यानंतर आता १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ याकालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान ६.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.


निसर्गाच्या भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांवर लक्ष केंद्रीत करून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यास सुरूवात करण्यात आली. निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध शासकीय योजना, कार्यक्रम, उपाययोजना एकत्रित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे व मिशनमोड पद्धतीने राबविण्यासाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच टप्प्यात माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी झाली आहे.




राज्यातील २८,३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार अंमलबजावणी


माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणीनंतर ‘माझी वसुंधरा अभियान ६.०ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत नोंदणी केलेल्या ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व २७८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान ६.० राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्या निहाय गट करून स्पर्धा घेण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला असून त्यावर १५ जुलै २०२५ पर्यंत सूचना/अभिप्राय मागविण्यात आले आहे. त्या सूचनांचा विचार करून अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) अंतिम करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीच्या संकटावर पंतप्रधानांचे फडणवीसांना आश्वासन

पंतप्रधानांचा मुंबई दौरा आणि नवी मुंबई विमानतळाचे नामकरणही होणार पूरस्थिती, संरक्षण कॉरिडॉर आणि 'पोलाद सिटी'सह

पुण्याचा पालकमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्याला मीच पाडलं: अजित पवारांचा टोला

तुम्हाला कळतं का ? मागचा अजित पवार आणि आताचा अजित पवार फार फरक झालाय - पुण्यात अजितदादांची जोरदार फटकेबाजी पुणे :

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी भाऊबीज भेट; महाराष्ट्र सरकारने केले ४०.६१ कोटी मंजूर

मुंबई: महाराष्ट्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना २,००० ची

Red Alert : २४ तासांत पुन्हा मुसळधार! धाराशिव जिल्ह्यांसाठी पुढील २४ तास धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा

सोलापूर : मराठवाडा विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या

धाराशिवला पुराचा फटका पण जिल्हाधिकाऱ्याला थिरकण्याचा मोह आवरेना

धाराशिव : मराठवाड्यातील नांदेड, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार

मान्सूनचा मुक्काम लांबणीवर!

मराठवाड्यासह विदर्भात अस्मानी संकट आणखी गडद होणार मुंबई : पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच जाता-जाता