ठाणे-पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या उभारणीत ऐतिहासिक टप्पा

साखरे गावात देशातील सर्वात जड बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या बसवला


ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कामांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मीटर लांबीचा पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (PSC) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा पहिलाच गर्डर बसवण्यात आल्याने हा क्षण अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


हा गर्डर ९७० मेट्रिक टन वजनाचा असून त्यासाठी ३९० घनमीटर काँक्रीट आणि ४२ मेट्रिक टन स्टील वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गर्डर्स कोणतेही सांधे न ठेवता, एकसंध स्वरूपात बनवले जातात. प्रकल्पात या प्रकारचे गर्डर्स वापरणे हे कामाच्या जलद गतीसाठी उपयुक्त ठरत असून ते सेग्मेंटल गर्डर्सच्या तुलनेत दहा पट जलद काम पूर्ण करतात. ठाणे ते पालघरपर्यंत बुलेट ट्रेनसाठी उभारण्यात येणाऱ्या उंचावरील मार्गिका (व्हायाडक्ट), डोंगरी बोगदे, विशेष मातीच्या संरचना आणि स्थानकांच्या कामांमध्ये सातत्याने प्रगती होत आहे. शिळफाटा ते झरळी (महाराष्ट्र-गुजरात सीमा) दरम्यान १३५ किमी लांबीच्या उंचावरील मार्गिकेचा समावेश असून यामध्ये १०३ किमी लांबीचा व्हायाडक्ट, २.३ किमी लांबीचे स्टील पूल, १.३ किमी स्थानक परिसर आणि ११ किमी बोगदे व मातीची संरचना यांचा समावेश आहे.


या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात अनेक कास्टिंग यार्ड्स कार्यान्वित असून गर्डर्सची निर्मिती, साठवणूक व बसवणी तंत्रज्ञानयुक्त स्वदेशी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने करण्यात येते. अलीकडेच विरार व बोईसर स्थानकांवरील पहिल्या स्लॅबच्या कास्टिंगचे कामही पूर्ण झाले असून, ठाणे-पालघर विभागातून बुलेट ट्रेन प्रकल्पात यशस्वी गतीने पुढे वाटचाल होत आहे.

Comments
Add Comment

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

अरे बापरे! तब्बल १२ हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त! मीरा-भाईंदर पोलिसांची कमाल!

मीरा-भाईंदर: मीरा रोडमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना