कल्याणच्या स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या सिद्धार्थ नगरकडून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त आहे. दरम्यान जागरूक नेटकऱ्यांनी स्कायवॉकवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याचा व्हीडियो समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्कायवॉकवर कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे.

या स्कायवॉकवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पादचारी, रेल्वे प्रवासी, बाजारहाट करण्यासाठी ये-जा करणाऱ्या गृहिणींना नाक मुठीत धरून चालावे लागते. चोहोबाजूंनी थुंकलेल्या भिंती, कोपऱ्या-कोपऱ्यात कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि प्रचंड घाण, याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडविणाऱ्या या स्कायवॉककडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महापालिकेला स्वच्छता कर, तर रेल्वे प्रशासनाला प्रवासाचे शुल्क भरूनही कुणालाही स्वच्छतेची जबाबदारी घ्यायची नाही. नेहमीप्रमाणे या भागाची जबाबदारी झटकणाऱ्या संस्था एकमेकांकडे बोट दाखवणार आणि जनतेच्या सहनशीलतेचा फायदा घेत मोकळ्या होणार. दरम्यान प्रशासन जर हात झटकून मोकळे होणार असेल, तर करसंकलन बंद करावे आणि नागरिकांनी स्वतः झाडू घेऊन स्वच्छता करावी का? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

 
Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे