Air India मोठी अपडेट - 'पुन्हा' होता होता वाचला अपघात ! हैद्राबाद ते मुंबई विमानाची घटना ! याशिवाय ही 'माहिती' समोर

प्रतिनिधी: आज पुन्हा एकदा एअर इंडिया विमानाच्या तावडीतून प्रवासी मरता मरता वाचले आहेत. हैद्राबाद ते मुंबई उड्डाण करत असलेल्या विमानाचा अपघात होता होता वाचला आहे. विमान उड्डाणापूर्वीच तांत्रिक अडचणीचा थांगपत्ता लागल्याने ९२ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. राजीव गांधी विमानतळ येथून हे विमान उड्डाण घेणार होते. दरम्यान या तांत्रिक अडचणींचा पत्ता लागल्यावर या विमानाचे उड्डाण रद्द केले आहे. आणि या विमान प्रवाशांची दुसऱ्या विमानात सोय एअर इंडियाने केल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. मुंबईला जाणाऱ्या AI 2534 हे विमानाचा हा प्रसंग आहे. पायलटचा समयसूचकतेमुळे अनेकांचा जीव वाचला आहे. याच दरम्यान सर्व लोकांना भयभीत केले होते. विमान उडवातानाच काही क्षणात चालकाला याचा थांगपत्ता लागल्याने मोठी दुर्घटना टाळली गेली आहे.

यापूर्वी नुकत्याच अहमदाबाद येथील विमान अपघात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या भयाण अपघातानंतर विमान यंत्रणेने या घटनेची चौकशी सुरू केली होती.

अहमदाबाद घटनेतील दोषी कर्मचाऱ्यांचे निलंबन !

अहमदाबाद येथील घडलेल्या भारतीय विमान अपघातातील मोठा अपघात म्हणून नोंद झालेल्या अपघातामुळे विमान प्रशासनाचे धाबे दणाणले होते. अशातच समोर आलेल्या माहितीनुसार, Directorate General of Civil Aviation (DGCA) ने एअर इंडियाच्या तीन दोषी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या तीन हकालपट्टी झालेल्यांमध्ये एका विभाग उपाध्यक्ष (Divisional Vice President)चा देखील समावेश आहे. मात्र त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. डिजीसीएने केलेली ही मोठी कारवाई आहे.

अहमदाबाद भीषण अपघातानंतर, या आठवड्याच्या सुरुवातीला डीजीसीए आणि एअर इंडिया आणि तिची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या आढावा बैठकीत नियामकाने (Regulator) वाहकाच्या ऑपरे शनल कामगिरीचे मूल्यांकन केले आणि बोईंग ड्रीमलाइनर फ्लीटवर केलेल्या सुरक्षा तपासणीवर चर्चा केली होती. त्यातून ही कारवाई निष्पन्न झाली आहे. या चौकशीदरम्यान कुठल्याही प्रकारची सुरक्षेबाबतीत कुठलाही गंभीर हलगर्जीपणा निदर्शनास आलेला नाही. मात्र काम करताना केलेल्या चूकभूलीमुळे या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई झाली आहे.तथापि, एअरलाइनच्या ड्रीमलाइनर ताफ्यात सातत्याने येणाऱ्या व्यत्ययांबद्दल नियामकाने टिप्पणी केली. विशेष म्हणजे, १२ ते १७ जून दरम्यान एअर इंडियाने ६६ बोईंग ७८७ उड्डाणे रद्द केली. डीजीसीएने एअरलाइनला रिअल-टाइम दोष अहवाल प्रणाली (Real time defect reporting system) सुरू करण्याचा सल्ला चौकशी अभ्यासात दिला आहे ज्यामुळे ऑपरेशनल आणि सुरक्षा विभागांना महत्त्वाची माहिती सहज आणि जलद प्रसारित यानिमित्ताने करता येणार आहे.
Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आता लोकायुक्तांच्या चौकशीकक्षेत

महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत मंजूर नागपूर : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला

पुणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना वारंवार करावी लागते 'प्रेग्नन्सी टेस्ट'; आमदारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

नागपूर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टीवरून परतल्यानंतर वारंवार

मुंबईकरांसाठी मोठी भेट, ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा सुधारीत भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून

महसूली सुनावण्याचे अधिकारी राज्यमंत्री, सचिवांनाही!

विभागातील १३ हजार अपीलांच्या निपटाऱ्यासाठी मार्ग मोकळा मामलतदार न्यायालय अधिनियमन सुधारणा विधेयक विधानसभेत

मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना हक्काचे घर

'मदत माश' जमिनीच्या मोफत नियमितीकरणाचा मार्ग मोकळा ​'वर्ग-२' च्या जमिनी आता होणार 'वर्ग-१' महसूल मंत्री चंद्रशेखर

महसूल विभागातील सर्व खटले ९० दिवसांत निकाली काढणार

महसूलमंत्र्यांचे आश्वासन; सुनावण्यांचे अधिकार आता राज्यमंत्री आणि सचिवांनाही नागपूर : महसूल विभागातील