SRK house Mannat Renovation: शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यावर अनधिकृत बांधकाम! नेमकं प्रकरण काय?

SRK house Mannat Renovation Controversy: बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आणि त्याचा मन्नत हा बंगला सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शाहरुखने आपल्या बंगल्याच्या डागडुजीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे तो सध्या आपल्या कुटुंबासोबत एका भाड्याच्या घरात राहत आहे. मात्र यादरम्यान मन्नतवर बेकायदेशीर बांधकाम होत असल्याची चर्चा होत आहे. त्या संदर्भात बीएमसीचे अधिकारी देखील सदर ठिकाणची पाहणी करून गेले असल्यामुळे, याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेट.


शाहरुख खानचा मन्नत हा बंगला मुंबई उपनगरातील बांद्राच्या समुद्रकिनारी स्थित आहे. त्याचे अनेक चाहते शाहरुखची झलक पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात. मात्र आज शाहरुखच्या या बंगल्यावर बीएमसीचे कर्मचारी आले होते. या बंगल्याच्या नूतनीकरणादरम्यान सीआरझेड कोस्टल रेग्युशन झोन नियमाविरुद्ध काम केल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात माहिती अधिकारी संतोष दौंडकर यांनी ही तक्रार केली आहे. शाहरुखचा बंगला मन्नत हा ग्रेड 3 हेरिटेज स्ट्रक्चर्सपैकी एक आहे. म्हणून बंगल्यात तुम्हाला पर्यायी बदल करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  ज्यावर आता किंग खानची मॅनेजर पूजा ददलानीने शाहरुखची बाजू मांडत,  मन्नतसंबंधित करण्यात आलेल्या सर्व आरोपांना उत्तर दिले आहे.



पूजा ददलानी काय म्हणाली?


बीएमसी कर्मचाऱ्यांच्या साइट भेटीदरम्यान, शाहरुख खानच्या स्टाफनी तपासणी पथकाचे स्वागत केले आणि त्यांना आश्वासन दिले की चालू नूतनीकरणासाठी सर्व संबंधित परवानग्या आणि कागदपत्रे योग्यवेळी सादर केली जातील. तसेच या संदर्भात शाहरुखची दीर्घकाळापासूनची मॅनेजर पूजा ददलानीने कोणत्याही गैरप्रकाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, तिने नूतणीकरणासंबंधित कोणतीही तक्रार नाही आहे. सर्व काम मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू असल्याचे सांगितले.



काय आहे नेमके प्रकरण?


वन विभागाचे एका अधिकाऱ्याने भेटीबद्दल प्रकाशनाला सांगितले की तक्रार मिळाल्यानंतर एका पथकाने साईटची तपासणी केली. माजी आयपीएस अधिकारी वायपी सिंग यांच्या आरोपांनंतर दौंडकर यांची तक्रार समोर आली. सिंग यांनी आरोप केला की मन्नतची अतिरिक्त इमारत २००५ मध्ये शहरी जमीन कमाल मर्यादा कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आली होती. सुरुवातीला या मालमत्तेवर १२ लहान फ्लॅट बांधण्यास मान्यता देण्यात आली होती, परंतु नंतर शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्यासाठी हे फ्लॅट एका आलिशान घरात रूपांतरित करण्यात आले, असा दावा त्यांनी केला. यामध्ये पालिका अधिकारी सहभागी असल्याचा आरोप सिंह यांनी केला. त्यामुळे या जागेचा मूळ नकाशा पुनर्संचयित करण्याची मागणी त्यांनी केली जेणेकरून गृहनिर्माण नियमांचे पालन करता येईल.



सध्या कुठे राहतो आहे शाहरुख खान?


मन्नतमधील काम सुरू असल्याने, शाहरुख खान आता त्याच्या कुटुंबासह चित्रपट निर्माते वाशु भगनानी यांच्या वांद्रे येथील पाली हिल येथील चार मजली अपार्टमेंटमध्ये राहत आहे.


Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल