भंडारदरा परिसरातील वाकी बंधारा ओव्हर फ्लो

अकोले : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाकी येथील लघुवबंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून निळवंडे धरणाचा मध्ये नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट व परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून महाराष्ट्राचे एवरेस्ट समजला जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर मुसळधार पाऊस सुरू आहे .त्यामुळे कृष्णावंती नदीला प्रचंड प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे वाकी येथील ११२ दलघफुट क्षमतेचा लघु बंधारा हा ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे निळवंडे धरणामध्ये नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे.

जिल्ह्यामध्ये पिंपळगाव खांड व आंबित धरण भरल्यानंतर वाकी हे धरण तिसरे भरलेले धरण ठरले आहे .अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे पावसाचे माहेरघर समजले जाते . गत तीन ते चार दिवसापासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्री प्रचंड प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे रतनवाडी येथे ७ इंच तर घाटघर येथे ६ इंच पावसाची नोंद झाली . सततच्या पडत असलेल्या पावसामुळे डोंगरावरून धबधब्यांच्या मालिका सुरू झाल्याने ओढे नाले खळखळून वाहत असल्याकारणाने तसेच रतनवाडी येथील प्रवरा नदी दुथडी वाहत असल्याने भंडारदरा धरणामध्ये जवळजवळ २४ तासांमध्ये अर्धा टी एम सी नवीन पाण्याची आवक झाली . त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा ३२३४ दलघफु झाला असून भंडारदरा धरण २९ टक्के भरले आहे.धरणामध्ये २४ तासामध्ये ४३५ दलघफु नवीन पाण्याची आवक झाली आहे.गत २४ तासांमध्ये पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या घाटघरला १५७ मी मी पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत सर्वात जास्त पाऊस हा बुधवारी रतनवाडी येथे नोंदला गेला असून १६९ मी मी पाऊस तेथे पडला.भंडारदरा येथे १२२ मी मी तर पांजरे १२५ मी मी व वाकी येथे ८९ मी मी पाऊस पडला.सदर पावसाच्या आकडेवारीवर भंडारदरा धरण शाखेचे शाखाधिकारी प्रवीण भांगरे यांच्या अधिपत्याखाली वसंत भालेराव, हौशीराम मधे, चंदर उघडे, बाळासाहेब भांगरे, चंद्रकांत भगत, सुरेश हंबीर व इतर कर्मचारी हे लक्ष ठेवून आहेत.
Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

नागझिरा अभयारण्यात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन

अमरावती : विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत