मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकरांच्या नियुक्तीनं राजकीय खळबळ

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे त्या भाजपामध्ये प्रवेश करणार का, यावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे.



घोसाळकर यांचे पती, माजी संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची पत्नी तेजस्वी यांना संचालक म्हणून नेमण्यात आले आहे. हा निर्णय "सद्भावनेतून" घेतल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष आणि भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केला असला, तरी ही नियुक्ती ठाकरे गटासाठी धक्का मानली जात आहे.


दरम्यान, तेजस्वी यांचे भाजपामध्ये जाणे जवळपास ठरलेले असल्याची चर्चा आधीच सुरू होती. गेल्या वर्षभरापासून त्या संचालकपदासाठी प्रयत्नशील होत्या, आणि अखेर कालच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


प्रवीण दरेकर यांनी या नियुक्तीचे समर्थन करताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. "मराठी मतदार आमच्यासोबत आहे, तो पाकिस्तानी नाही," असे सांगत त्यांनी ठाकरेंच्या ‘मराठी माणसाच्या मतांवर’च्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.


दरेकर पुढे म्हणाले, "बाळासाहेबांचे खरे वारस आम्ही आहोत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांचा ब्रँड आज एकनाथ शिंदेंकडे आहे."


दरम्यान, या नेमणुकीने राजकारणातील नवीन समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटातून माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या भाजपात जाणार हे निश्चित झाले असून आता त्यांचे सासरे विनोद घोसाळकर हे काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ, पोलिसांनी केला हस्तक्षेप

छत्रपती संभजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजिलेल्या

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी