चला... विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला!

पालघर: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याकरिता एसटी प्रशासनाकडून राज्यात सर्वत्र विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील आठ आगारांमधून सुद्धा ५५ बस पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना भाविकांना सुलभतेने पंढरपूरला जाता यावे याकरिता पालघर विभागाच्या आठही आगारातून विशेष ५५ बसेस पंढरपूरला सोडण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.


एखाद्या गाव वाड्यातून एकत्रित बुकिंग असेल तर थेट गावातूनच पंढरपूरला बस सोडण्यात येणार आहेत. ६ जुलै रोजी राज्यात सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येथे दर्शनाकरिता जात असतात. पंढरपूरला जाण्याकरिता एसटी प्रशासनाकडून दरवर्षी जादा बसेसची सोय उपलब्ध करून देण्यात येते.


पालघर जिल्ह्यातील पालघर, सफाळा, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर व नालासोपारा या आगारांमधून पंढरपूरकरिता बसचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी बसमध्ये महिला, वयोवृद्ध व अपंग यांना सवलतीच्या दरात तिकीट आकारण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या

डहाणू नगर परिषद निवडणुकीत थेट लढत!

पालघर, वाडा, जव्हारमध्ये तिरंगी लढत पालघर : नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

वाडा नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

कुडूस  : वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून वाडा नगरपंचायत निवडणुकीत खरी लढत ही

वसई-विरारमध्ये ५२ हजार दुबार मतदार

मतदारांकडून लिहून घेणार हमीपत्र विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

चार नगर परिषद निवडणुकीसाठी १२५ मतदान केंद्र ; प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, या नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज