ऑनलाइन फसवणुकीपासून कसे वाचाल ?

मुंबई : ऑनलाइन फसवणुकीला दररोज कोणीतरी बळी पडत आहे . वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाइन फसवणूक केली जाते , ओटीपी शेयर केल्याने , चुकून काही फोटो डाउनलोड केल्याने किंवा नोकरीचे आमिष दाखवून , अशा अनेक प्रकारे ऑनलाइन फसवणूक होत असते .


फसवणूक झाल्यानंतर जर आपण काही अवधीमध्ये तक्रार नोंदवली तर आपले नुकसान होण्याची शक्यता कमी होते .



अशा ऑनलाइन फसवणुकीतून वाचण्यासाठी एक गोल्डन अवर नावाची एक तक्रार करण्याची प्रक्रिया आहे , ज्यात वेळेचे बंधन आहे , जर आपली फसवणूक झाली असेल तर ताबडतोब सायबर क्राइम पोर्टल क्रमांक १९३० वर कॉल करून आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा .


घटना घडल्यानंतर ५ मिनिटाच्या अवधीमध्ये जर आपण पोलिसांशी संपर्क साधला तर आपले खाते बंद केले जाईल आणि पैसे वाचतील . जर पोलिसांना या गोल्डन अवर मध्ये संपर्क केला तर ते ज्या व्यक्तीबरोबर फसवणूक झाली आहे त्या व्यक्तीच्या खात्यावरील पैसे दुसऱ्या खात्यात जाण्यापासून वाचवता येतात .

पोलिसांच्या मते, सायबर गुन्हेगार अनेक खात्यांमध्ये कितीही रक्कम ट्रान्सफर करतात आणि मनी ट्रान्सफरचा एक टप्पा तयार करतात . उदाहरणार्थ, दिल्लीतील फसवणुकीचे पैसे मुंबई , पुणे मार्गे केरळमध्ये अल्पावधीत पोहोचतात . जर पोलिसाना गोल्डन अवर मिळाला तर ही पैसे ट्रान्सफर होण्यापासून ते रोखतात . जितक्या लवकर पोलिसांना अशा घटनेची माहिती दिली जाईल तेवढा वेळ पोलिसांना खाते बंद करण्यास मिळेल . या कामात एक दिवसही विलंब झाला तरी तो महागात पडू शकतो आणि पीडित व्यक्तीला त्याचे सर्व पैसे गमवावे लागू शकतात.


त्यामुळे अशी घटना जर तुमच्या बरोबर घडली तर सर्वात आधी या गोल्डन अवर मध्ये पोलिसांशी संपर्क साधा जेणेकरून तुम्ही या ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही .

Comments
Add Comment

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची खांदेपालट, कुणाची कुठे बदली, कुणाची कुठे वर्णी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा सहायक आयुक्तांची खांदेपालट करून विद्यमान सहायक आयुक्तांची

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 'या' दिवशी १० टक्के राहणार पाणीकपात

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ