उद्धव यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी असे दिले उत्तर

जळगाव : मराठी माणसांची युती होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी गुरुवारी घेतलेल्या सभेतून केली. या टीकेबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मार्मिक शब्दात उत्तर दिले. बोल बच्चनना मी उत्तरे देत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री जळगाव येथे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी म्हणून आले होते. या प्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना उद्धव यांच्या भाषणाचा संदर्भ देत प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांना मार्मिक उत्तर दिले. यानंतर मुख्यमंत्री इतर विषयांवर विस्तर बोलले.

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मुंबईत गुरुवार १९ जून रोजी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे तिकडे गाठीभेटी घेत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. यावेळी बोलताना, बोल बच्चनना मी उत्तरे देत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमदार एकनाथ खडसे कार्यक्रमाला येणार का, या प्रश्नावर माहिती नाही, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
Comments
Add Comment

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

कचऱ्यात आढळले मृत नवजात अर्भक

डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील साखरे येथील आश्रमशाळेजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास नवजात अर्भक मृतावस्थेत