शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यंगचित्रातून उद्धव सेनेची उडवली खिल्ली

  97

मुंबई : शिवसेना या पक्षाची स्थापना १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी केली. या पक्षाच्या स्थापनेला आज म्हणजेच गुरुवार १९ जून २०२५ रोजी ५९ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा वरळीतील एनएससीआय डोममध्ये होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याप्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

उद्धव सेनेत गोंधळाची स्थिती

उद्धव सेनेची म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या पक्षाची स्थापना १० ऑक्टोबर २०२२ रोजी झाली. पण उद्धव सेनेनेही १९ जून रोजी सभेचे आयोजन केल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. उद्धव सेनेचा म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या पक्षाचा वर्धापन दिन १० ऑक्टोबर रोजी आहे. या परिस्थितीत १९ जून रोजी एकदा आणि १० ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा असा एकाच पक्षाचा दोन वेगवेगळ्या दिवशी वर्धापन दिन साजरा करावा का, असा संभ्रम नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. हीच बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकाने व्यंगचित्रातून मांडली आहे. हे व्यंगचित्र व्हायरल होत आहे.



खरी शिवसेना

खऱ्या शिवसेनेचे नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शिउबाठाने आज कार्यक्रमाचे आयोजन करणे हास्यास्पद असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिक व्यक्त करत आहेत. ज्या पक्षाची स्थापनाच १० ऑक्टोबर २०२२ रोजी झाली त्यांनी १९ जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्याला काही अर्थच नाही, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी