SBI Report : CRR रेशोत कपात केल्यामुळे मिळणार अर्थव्यवस्थेत चालना कर्जपुरवठा 'इतक्या' टक्क्याने वाढणार - एसबीआयचा अहवाल

प्रतिनिधी: नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर (Repo Rate) व कॅश रिझर्व्ह रेशो (Cash Reserve Ratio CRR) मध्ये कपात केली होती. वित्तीय पतधोरण समितीचा (Monetary Policy) हा निर्णय गर्व्हनर संजय मल्हो त्रा यांनी जाहीर केला होता. त्यामुळे सीआरआर (CRR) मध्ये घट केल्याने अर्थव्यवस्थेतील कर्जपुरवठा (Credit) मध्ये १.४ ते १.५% वाढ होणार असल्याचा अहवाल स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केला आहे. पतपुरवठा सुधारल्याने एक प्रकारे अर्थव्यवस्थेतील तरलता (Liquidity) वाढण्यास मदत होणार असल्याचे या एसबीआय अहवालात म्हटले गेले आहे.

'सीआरआर दर कपात केल्याने कर्जदेय संसाधन पुरवण्यात वाढ होणार आहे. ज्यामुळे कर्ज वितरणात याचा फायदा होऊन अतिरिक्त १.४ ते १.५ क्रेडिट वाढेल 'असे निरिक्षण या अहवालात व्यक्त केले गेले. यापूर्वी सेंट्रल बँकेने रेपो दरात ०.५०% बीपीएस बेसिसने कपात केल्याने रेपो दरात ६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर पोहोचले होते. तर सीआरआर दर १% कमी केल्याने ३% झाला होता.'

याशिवाय सीआरआर घटला म्हणून याचा संबंध कर्जपुरवठ्यातील दरात (Lending Rates) अथवा ठेवी (Deposits) यांच्या बदलातील नसून हा बँकेच्या नफ्यात वाढ करणारा ठरणार आहे. ज्यामुळे बँकेच्या नेट इंटरेस्ट मार्जिन (Net Inte rest Margin NIM) मध्ये ३ ते ५ पूर्णांक बेसिसने वाढ होईल असे अहवालात म्हटले गेले आहे. अहवालातील माहितीनुसार, या दर कपातीमुळे तरलता वाढून बँकाना मुबलक कर्ज पुरवठा करण्यात मदत होणार आहे त्यामुळे बँकेच्या कोस्ट फंडिग (Cost Funding) मध्ये घट होत तरलताही निर्माण होईल.

एसबीआय रिपोर्टनुसार,कर्ज वाढीला १.४ ते १.५ टक्क्यांनी चालना देण्यासाठीच नाही तर आरबीआय रोख राखीव दर (CRR) हा तरलता व्यवस्थापनासाठी केवळ उपयुक्तच नाही तर बाजारातील पुरवठ्याचे नियमन, कालावधी चक्र (Peri od Cycle) यामध्ये सुसुत्रता आणण्यास कामी येईल.बाजारातील सीआरआर हा विशेषतः टर्म मनी मार्केट (Money Market) नियंत्रित करण्यासाठी कामी येऊ शकतो. आरबीआयच्या निर्देशांनतर या दरांची सुसत्रता बाजारात एकत्रित परिणाम दाखवू शकते असे निरिक्षण अहवालात दर्शविले गेले आहे.
Comments
Add Comment

जिल्ह्यात ४५४ बालके कुपोषित

उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव अलिबाग : महिला व बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रायगड

मुलुंड कचराभूमीतील कचरा विल्हेवाट प्रकल्पाला फेब्रुवारी २०२६ची मुदत

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ६८ टक्के काम पूर्ण मुंबई : मुलुंड कचराभूमीतील कचऱ्याच्या डोंगरांची शास्त्रीय

'कैरी' सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर

सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची ‘कैरी’मधील मनाला भिडणारी दोस्ती, दोघांचा इमोशनल बॉण्ड ठरणार लक्षवेधी मैत्री

निवडणुकीच्या कामाला नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भांतील विविध कामे प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतली आहेत.

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा