हिंदमातासह परिसरात तुंबणाऱ्या पाण्यासाठी १०० कोटींचा खर्च

  28

पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी सहा पंपिंग स्टेशन



  • मिनी पंपिंग स्टेशनचीही निर्मिती

  • चार वर्षांकरता पंप देखभालीसाठी दिले कंत्राट

  • दरवर्षी सुमारे ६ कोटी वापरले जाणार


मुंबई :मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोठ्या सहा पंपिंग स्टेशनसोबत तीन लघु पंपिंग अर्थात मिनी पंपिंग स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. कलानगर, किंग सर्कलमधील गांधी मार्केट आणि हिंदमाता परिसरातील साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशनच्या तीन वर्षांच्या देखभालीवर तब्बल १०० कोटींवर खर्च करण्यात येत आहे. यामध्ये मातोश्री अंगणात अर्थांत कलानगरमध्ये पाणी साचले जावून म्हणून कलानगरमध्ये कोविड काळात मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी केली असून याठिकाणी पाणी साचले जावून नये म्हणून दरवर्षी सुमारे ६ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.


पावसाळ्यात अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याची ठिकाणांवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी इर्ला, लव्हग्रोव्ह, हाजीअली, ब्रिटानिया आदी पंपिंग स्टेशनची उभारणी केली जात असली तरीही काही भागांमध्ये तुंबणाऱ्या पाण्यासाठी विविध ठिकाणी पंप बसवण्याची कामे हाती घेण्यात आली आहे.


कलानगर लघू पंपिंग स्टेशन


पंप बसवण्याचा कालावधी : सन २०२५ ते सन २०२८
पंप बसवण्यासाठी येणारा खर्च : २४.७८ कोटी रुपये
कंपनीची नाव : महाबल इन्फ्रा, इंजिनिअरींग कंपनी
१००० घनमीटर पंप : १७ पंप
२४० घनमीटर पंप : ०४


गांधी मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव


पंप बसवण्याचा कालावधी : सन २०२५ ते सन २०२८
पंप बसवण्यासाठी येणारा खर्च : २६. १६ कोटी रुपये
कंपनीची नाव : साज एंटरप्रायझेस
३००० घनमीटर क्षमतेचे : ०६ पंप
१००० घनमीटर क्षमतेचे : ०२ पंप
५०० घनमीटर क्षमतेचे : ०६ पंप


परळ हिंदमाता आणि मडके बुवा परिसर


पंप बसवण्याचा कालावधी : सन २०२५ ते सन २०२८
पंप बसवण्यासाठी येणारा खर्च : ५१.२५ कोटी रुपये
कंपनीची नाव : एआर ए-एएनसी संयुक्त भागीदार एकूण पंप : ०९ मोठे पंप

Comments
Add Comment

Kabutar Khana : "१००% टॅक्स लावा, आम्ही तयार!", कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक!

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे.

Khalid Ka Shivaji : शिवरायांचा वापर करून फूट पाडण्याचा डाव? 'खालिद का शिवाजी' विरोधात हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड रोष

मुंबई : 'शिवराय' म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये