मुंबई तसेच उपनगरात पावसाची हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

मुंबई: राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई तसेच उपनगरातही रात्रीपासूनच पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील ३ ते ४ तासांत मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला.


कल्याण-डोंबिवलीतही जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई तसेच उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक थोडी उशिराने सुरू आहे.


पावसामुळे मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात केली आहे. दरम्यान, नोकरदार वर्गाने पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे.



पुण्यातही पावसाला सुरूवात


मुंबईप्रमाणेच पुण्यातही सकाळपासून पावसाला सुरूवात झालीये. अनेक भागात संततधार सुरू आहे. आज पुण्यात दिवसभर पावसाचा इशारा दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस चालू आहे.



मुंबईला ऑरेंज अलर्ट


हवामान विभागाने मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Comments
Add Comment

प्रभाग आरक्षणात दिग्गजांचे प्रभाग गेले; मुंबईत रवीराजा, विशाखा राऊत, नील सोमय्या, सदा परब, आसिफ झकेरियांना यांना फटका

अनेकांचे प्रभाग कायम राखले मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२७

मुंबईतील सर्वसामान्य प्रवर्गाचे प्रभाग कोणते आहेत, जाणून घ्या

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी ११

मुंबईत ओबीसी प्रभाग कोणते आहेत, जाणून घ्या

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी ११

मुंबईत अनुसूचित जाती आणि जमातीचे कोणते आहेत प्रभाग, जाणून घ्या

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी ११

आठव्या मजल्यावरून पडून मजुराचा जागीच मृत्यू

मालाड : मालाड पूर्व येथील शांती नगर भागात सुरू असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकाम साईटवर आठव्या मजल्यावरून

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती गरजेची !

रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना मुंबई  : सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तथा रस्ता