Maharashtra Rain Updates : कोसळधार पावसानं रायगड अन् पुणेला झोडपलं! रायगडमध्ये शाळांना सुट्टी

  159

पुणे : पुण्यात सकाळपासून पावसाची तुफानी सुरु आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खेड आणि नागोठणे या शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्यात गेले आहेत. यामुळे प्रचंड वाहतूक कोडींही झाली आहे. सिंहगड रोडवर पाणीच पाणी फ़ायतला मिळतंय.



सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी


सकाळपासून पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पाणी घुसल्याचंही समोर आलं आहे. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वडगाव खुर्द इथल्या लालगड मळा वाहतूक सिग्नलवर खोदकाम सुरू आहे. खड्डा पाण्याखाली गेला असून इथं पाणी साचलं असल्यानं अपघाताची शक्यता आहे. धायरी सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी पूर्णपणे वाहतूक कोंडी झाली आहे. पुढचे २४ तास मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.



रायगमध्ये नद्यांना पूर


रायगडमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. खोपोली-वाकण वाहतूक ठप्प झाली आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडलीय. अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आलं आहे. पोलिसांनी रस्त्यावर पाणी आलेल्या मार्गावरून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.



रायगड जिल्ह्यात शाळांना सुट्टी


हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे आज प्रशासनाकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडला अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. खोपोली, पेण, रोहा या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांसह सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’