उद्धव ठाकरे रंग बदलणारा सरडा - एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

  83

मुंबई : बाळासाहेबांच्या विचारांचा आणि शिवसेनेचा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला. सरडाही रंग बदलतो, पण यांच्या इतके लवकर नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण हिंदुत्व सोडलं नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणारे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केली.


मुंबईतील वरळी डोम येथे शिंदे गटाचा ५९ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला, यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अनेक प्रश्न उपस्थितीत केले. वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना, कम ऑन किल मी, हिंमत असेल तर या अंगावर असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी खिल्ली उडवली.एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाषणात म्हटले की, कमॉन कील मी. मला वाटतं ते इंग्लिश पिक्चर बघून आले असतील. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की, मेलेल्या माणसाला काय मारणार? कारण महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलेला आहे. वाघाच कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचा काळीज आणि मनगटात जोर लागतो. तो दम शिवसैनिकात आहे. त्यामुळे आमच्या नादाला तुम्ही लागू नका. तुमचा टांगा पलटी घोडं फरार आम्ही केलं आहे. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा सच्चा कार्यकर्ता मी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.



बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसचा विरोध केला. मात्र या लोकांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम केले. ठाकरे गटाने महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही आम्ही तडजोड करणार नाही. हिंदुत्वाची आम्ही कधी प्रतारणा करणार नाही, असे वचन आम्ही दिले आहे. मात्र काही लोकांना निवडणुका आल्यावर कार्यकर्त्यांची आठवण येते. एरव्ही ‘हम दो, हमारे दो’ असे म्हणत ठाकरेंवर टीका केली.


आपला मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. तर दुसरा मेळावा हा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे असे म्हणत सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला. हिंदुत्वाचा भगवा आपल्याकडे आहे. शिवधनुष्य आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशिर्वाद देखील आपल्याकडे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आपल्या पक्षात जी वाढ होतेय ही सर्वांच्या मेहनीची आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याचेच हे प्रतिबिंब असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.


राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. सध्या मुंबईचा लढा कॅम्पेन सुरू केले आहे. हा लढा आता आठवला, सत्तेत असताना काय केलं? लढायला घराबाहेर तर पडायला हवे. घरात बसून काही होत नाही. आता जे काही घरातून बाहेर पडत आहात त्या मागे श्रीकांत शिंदे आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि कुणाचा बाप जरी आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकणार नाही.


बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले? याचा हिशोब द्या, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सवाल केला. आता म्हणतात, आम्ही हिंदुत्व सोडले नाही. मग बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट तुम्ही का म्हणत नाही, असा सवाल देखील एकनाथ शिंदे यांनी केला. हिंदुत्व आमचा श्वास आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.


भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले 'कमॉन कील मी'. पण मी म्हणतो मेलेल्या माणसाला काय मारणार. महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलेला आहे. वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यासाठी वाघाचे काळीज आणि मनगटात जोर लागतो. तो दम शिवसैनिकात आहे. आमच्या नादाला तुम्ही लागू नका. तुमचा टांगा पलटी, घोडे फरार आम्ही केले आहे. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा सच्चा कार्यकर्ता मी असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी