Monsoon Update : मुसळधार पावसानं अनेक ठिकाणांना झोडपलं; २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

  47

गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात अनेक ठिकाणांना झोडपल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, गुरुवारी (दि.१९) पहाटेपासूनच पुण्यासह परिसरात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचेही दिसून आले आहे. भारतीय हवामान विभागानेही पुढील २ दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.


भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण किनारपट्टी आणि पावसाची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सह्याद्री पर्वत रांगेत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.



कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि कोकण प्रदेशात तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट


मध्य व उत्तर भारतातील काही राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. भारताचा बराचसा भाग हा मान्सूनने व्यापला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनरपट्टी, मुंबई, ठाण्यात अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. राज्यातील कोकण, पुणे, सातारा, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



पाटण तालुक्यातील पूल गेला वाहून


सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटण तालुक्यातील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे चिपळूण कराड वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याकडे जाण्यासाठी भोर आणि ताम्हिणी घाटाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोल्हापूरला जायचं असल्यास रत्नागिरी आणि देवरुख या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

केडीएमसी क्षेत्रात नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कल्याण (प्रतिनिधी): कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात

श्रावणाची चाहूल, भाज्यांचे दर कडाडले

टोमॅटो, फ्लॉवरचे भाव दुप्पट, तर कोथिंबिरीचे दर घसरले पेण(स्वप्नील पाटील) : अवघ्या दोन आठवड्यांवर श्रवण महिना आला

Jansurksha Bill : जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई: बहुचर्चित 'राज्य जनसुरक्षा विधेयक' अखेर आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं आहे. शहरी नक्षलवाद

गुरूपौर्णिमेच्या दिवशी घडली दुर्देवी घटना, भाविकांच्या वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

इगतपुरी : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यात दर्शनाला आलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला

शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार

राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९ हजार ८८९

शहापूरच्या शाळेची मान्यता रद्द, मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये - रूपाली चाकणकर

शहापूर: शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभाग