Gold Silver Rate: सलग दुसऱ्यांदा सोन्याचांदीच्या किंमती वधारल्या ! जागतिक आर्थिक संकटातही सोन्याचे शानदार प्रदर्शन

प्रतिनिधी: आज आंतरराष्ट्रीय बाजारातील मध्यपूर्वेतील दबाव कायम असताना बाजारातील सोन्यात सलग दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. 'गुड रिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याच्या दरात १७ रूपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम किंमत १०१०८ रूपये झाली आहे तर प्रति तोळा १७० रूपयाने वाढ झाल्याने किंमत १०१०८० रूपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्यात १५ रूपयाने वाढत झाल्याने किंमत ९२६५ रूपयांवर आहे तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ९२६५० रूपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमतीत १२ रूपयाने वाढ झाली आहे. तर प्रति तोळा किंमत १२० रूपयांनी वाढत ७५८१० रूपयांवर पोहोचली आहे.

आज मुंबई पुण्यासह मुख्य शहरातील सराफा बाजारातील सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी १०१०८ रूपये आहे. तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९२६५ रूपयांवर आहे.भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मधील सोने निर्देशांकात ०.०३% किरकोळ घसरण दुपारपर्यंत झाली होती. जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.८०% घट झाली.

चांदीच्या दरातही वाढ कायम !

आज सराफा बाजारात चांदीच्या दरातदेखील वाढ होत आहे.चांदीच्या प्रति ग्रॅम किमतीत १ रुपयाने किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो किंमतीत १००० रूपयांनी वाढ झाल्याने चांदीचे एक किलो दर ११२००० रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या एमसीएक्सवरील निर्देशांकात देखील ०.०३% घसरण झाल्याने चांदीची पातळी १०८५३५.०० रुपयांवर पोहोचली आहे.

आज मध्यपूर्वेतील इस्त्राईल इराण युद्ध सुरू असतानाही भारताने बाजारातील सोने चांदीच्या किंमतीत अपेक्षित घसरण रोखण्यात यश राखले आहे.किंबहुना बाजारातील फंडामेंटल मजबूत असल्याचा फायदा सोन्याचांदीला आज मिळत आहे. तसेच युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात काल कुठलाही कपात झालेली नाही त्यामुळे तो दर जैसे थे राहिला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोन्याला पर्याय म्हणून स्विकारण्याला पहिली पसंती दिली आहे. युद्धसंघर्ष शिगेला जात असताना पश्चिमी आशियाई देशात देखील दबावाचे वातावरण होते. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या मागणीत व किंमतीत वाढ होत असताना गुंतवणूकदार स्थावर मालमत्ता म्हणून सोन्याला अधिक पसंती देत आहेत.

काल युएस फेडदर ४.२५ ते ४.५०% व्याजदरात कुठलीही कपात झाली नाही. तज्ञांच्या मते स्थिर चलनवाढ, मंदावलेली वाढ आणि चालू जागतिक तणाव सोन्याला आधार देत आहेत, परंतु फेडचा आक्रमक प्रतिकार म्हणून काम करत आहे त. याशिवाय चांदीच्या औद्योगिक उत्पादनात वाढलेला वापर व सोन्याच्या तुलनेत माफक दरात म्हणून चांदीच्या गुंतवणूकीत वाढ झाल्याने निर्देशांकातही वाढ सुरूच आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवल्यानंतर भविष्यात कपातीचा वेग कमी करण्याचे संकेत दिल्यानंतर बुधवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली.तत्पूर्वी फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल म्हणाले होते की येत्या काही महिन्यांत मध्यवर्ती बँकेला 'अर्थपूर्ण प्रमाणात चलनवाढ' होण्याची अपेक्षा आहे.
Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग