पश्चिम रेल्वेच्या १२ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार

कर्मचाऱ्यांनी सुरक्षेसाठी दिले विशेष योगदान


मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे १७.०६.२०२५ रोजी झालेल्या कार्यक्रमात मुंबई विभागातील ६, पुणे विभागातील ३, भुसावळ विभागातील २ आणि नागपूर विभागातील १ अशा एकूण १२ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्काराने सन्मानित केले. कर्तव्या दरम्यान दक्षता दाखवून संभाव्य अपघात टाळण्यामध्ये आणि रेल्वेच्या सुरक्षित रेल्वे संचालनात मोलाचे योगदान दिल्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.


प्रत्येक पुरस्कारात पदक, गौरव प्रमाणपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्र व ₹ २०००/- रोख रक्कम देण्यात आली. पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची माहिती अशी आहे. मुंबई विभागातील पनवेल येथील वरिष्ठ लोकल व्यवस्थापक विक्की कुमार वसई – दिवा मेमूवर कर्तव्यावर होते. मेमू खारबाव भिवंडी रोड भागात येताच शेजारी जाणाऱ्या मालगाडीतून येणारा असामान्य आवाज आणि धूळ पाहून त्यांनी तत्काळ धोका ओळखला आणि सिग्नल दाखवून मालगाडीच्या ट्रेन मॅनेजरला सतर्क केले.


कुर्ला कारशेडमधील मास्टर क्राफ्ट्समन चांगदेव डुंगे यांच्या वाशी लोकल युनिटचे पॅन्टोग्राफचे पॅन तुटल्याचे लक्षात आले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळली. विद्याविहार येथील ट्रॅक मेंटेनर चंदन कुमार कर्तव्यावर असताना विद्याविहार, घाटकोपरदरम्यान डायमंड क्रॉसिंगवर तडे गेल्याचे दिसताच त्यांनी त्वरित खबरदारी घेतली. कुर्ला येथील सहाय्यक लोको पायलट मित्तल गडलिंग दादर यार्डमध्ये कॅटेनेरी वायर कॉन्टॅक्ट वायरवर लोंबकळत असल्याचे त्यांनी पाहिले. इगतपुरी येथील मास्टर क्राफ्ट्समन संदीप भालशंकर यांना मालगाडीच्या डब्यात बिघाड झाल्याचे दिसून आले.


कळंबोली येथील निष्ठ अभियंता निलेश शिंदे यांना मालगाडी तपासणीदरम्यान एक चाक नादुरुस्त आढळले. त्याचबरोबर चंदन कुमार यांनी विद्याविहार-घाटकोपर दरम्यान डायमंड क्रॉसिंगवर क्रॅक दिसताच त्वरित खबरदारी घेतली, अभिषेक लोहिया ७ व्या वॅगनकडून असामान्य आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अभिचंद्र यादव ४ जवळील सेकंडरी सस्पेन्शनची बाहेरील हेलिकल स्प्रिंग तुटलेली आढळली. संदीप पवार पिंपरी स्थानकाजवळ संशयास्पद वस्तू असल्याची माहिती मिळताच तपासणी करताना मातीखाली पुरलेली ११ जुन्या गोळ्या सापडल्या ज्या नंतर निष्क्रिय करण्यात आल्या. पवार सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर घटना टळली.


त्याचबरोबर उदय पटेल, दर्शन चंदन, एम. पी. देव या सर्वांच्या सतर्कतेमुळे तपासणी दरम्यान रुळांमध्ये गंभीर दोष आढळले आणि ते दुर करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आणि त्यांच्या कर्तव्यांप्रती असलेल्या सतर्कतेबद्दल आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक करताना, महाव्यवस्थापकांनी त्यांचे कौतुक केले. या प्रसंगी प्रतीक गोस्वामी, अतिरिक्त महाव्यवस्थापक चंद्रकिशोर प्रसाद, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी तसेच अन्य प्रधान विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी