Anil Ambani Reliance: मोठी बातमी: अनिल अंबानीची मोठी खेळी ! 'कमबॅक" करत थेट डॅसॉल्ट एव्हिएशनशी हातमिळवणी

आता नागपूरात बिझनेस जेट बनवणार !


प्रतिनिधी: गेली काही वर्ष व्यावसायिक चढउतार पाहिलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Reliance Infrastructure Limited) ने नुकतीच मोठी अपडेट समोर आणली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने फ्रान्सची नामांकित कंपनी डॅसॉल्ट एव्हिएशन (Dassault Aviation) या कंपनीची हातमिळवणी (Collaboration) केली आहे. त्यामुळे फाल्कन आता भारतात फाल्कन २००० बिझनेस (Falcon 2000 Business) जेट हे भारतात बनवणार आहे. फाल्कन त्याचे असेंबलिंग (Assembling) भारतात करणार आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजची इन्फ्रास्ट्रक्चरने टाय- अप केल्याने त्यांचा प्रकल्प डॅसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड (DRAL) नागपूर येथे होणार आहे.


विशेषतः युएस,फ्रान्स,कॅनडा, ब्राझील या कंपन्यांनंतर हे व्यवसायिक जेट बनवणारा भारत पाचवा देश ठरणार आहे. त्यामुळेच भारतासाठी ही प्रतिष्ठेची बाब असणार आहे. या ग्लोबल जॉईंट वेंचर हे भारतामध्ये फाल्कन ६ एक्स, फाल्कन ८ एक्स जेट (Falcon 6 X, Falcon 8X) ही जेट उत्पादने भारतात होतील. पॅरिस एअर शो (Paris Air Show) येथे ही घोषणा करण्यात आली आहे.


रिलायन्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिल अंबानी आणि डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी या नवीन कराराचा पुनरुच्चार करत या घोषणेला पुष्टी दिली आहे.' या करारातून फ्रेंच कंपनीचा 'मेक इन इंडिया' वचनबद्धतेची पूर्तता करण्याचा हेतू दिसून येतो. हे सहकार्य पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड' या दृष्टिकोनाप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेची एक शक्तिशाली अभिव्यक्ती (Commitment) आहे' असे अंबानी याप्रसंगी म्हणाले आहेत.


पहिले 'मेड इन इंडिया' फाल्कन २००० जेट २०२८ पर्यंत उड्डाण करणार आहे, जे कॉर्पोरेट आणि लष्करी वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल असे समुहांकडून सांगण्यात आले आहे.या भागीदारीमध्ये फाल्कन २००० फ्यूजलेज, विंग्स आणि फ्रंट सेक्शनची असेंब्ली, तसेच फाल्कन ८एक्स आणि फाल्कन ६ एक्ससाठी फ्रंट फ्यूजलेज वर्क यासारख्या महत्त्वाच्या उत्पादन प्रक्रियांचे डीआरएएलकडे हस्तांतरण (Key Production Transfer) समाविष्ट आहे.


मागच्याच आठवड्यात रिलायन्स डिफेन्सने जर्मनीची कंपनी Diehl Infrastructure या कंपनीशी १००० कोटींचा करार करत हातमिळवणी केली होती. त्यामुळे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आता मोठी घोडदौड सुरू केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात बघायला मिळू शकतो. आज दिनांक १९ जूनला रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर समभागात १.४५% टक्क्याने वाढ होत समभाग ३९२.४० रुपयांवर पोहोचला होता.


अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्राच्या समभागानी बुधवारी, १८ जून रोजी बीएसईवर इंट्राडे ट्रेडमध्ये ५ टक्क्यांची वरची पातळी गाठली कारण कंपनीने त्यांच्या उपकंपनीने भारतात फाल्कन २००० जेट्सचे उत्पादन करण्यासाठी डॅसॉल्ट एव्हिएशनसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली.

Comments
Add Comment

ड्रायव्हरने फरहान अख्तरला घातला १२ लाखांचा गंडा, जाणून घ्या अधिक माहिती...

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याची आई हनी इराणी यांच्या ड्रायव्हरने पेट्रोलच्या नावाखाली तब्बल १२ लाखांचा चुना

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल

“जॉली एलएलबी ३” ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; अर्शद वारसी आणि हुमा कुरेशीसाठी ठरतोय गेमचेंजर

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

नाव न सांगता साईबाबा चरणी "इतक्या" कोटींचा सोन्याचा हार अर्पण...

शिर्डी : साईबाबांचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान झाला. अनेक भाविकांनी दर्शनासाठी

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी