Amit Shah : गृहमंत्री शहांचा हल्लाबोल! देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल...

नवी दिल्ली : भारतीय भाषा या देशाच्या आत्म्याचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहेत. भारतीय भाषा ही आपली ओळख आहे त्याचा अभिमान बाळगावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. लवकरच इंग्रजीतून संवाद साधणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल असा समाज तयार होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांच्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अमित शाह बोलत होते. या वेळी त्यांनी भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित केले आणि इंग्रजी भाषेवरील अवलंबित्वावर जोरदार टीका केली. आपण आपल्या भाषिक वारशाचा अभिमान बाळगण्याची आणि त्याचा जागतिक स्तरावर गौरव करण्याची वेळ आली आहे असं अमित शाह म्हणाले. तसेच इंग्रजीवर अवलंबित्व असलेल्यांवर त्यांनी टीका केली.



 

इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल


अमित शाह म्हणाले की, "भारतीय भाषा ही आपली खरी ओळख आहे. लवकरच असा समाज निर्माण होईल ज्यामध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांना त्यांची स्वतःची लाज वाटेल. ज्यांना वाटते की हा बदल शक्य नाही, त्यांनी लक्षात घ्यावे की बदल दृढनिश्चयी लोकच घडवतात. आपल्या भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीची शान आहे."

'पंच प्राण' भारताच्या अमृतकालाचे संकल्प


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'पंच प्राण' संकल्पांचा उल्लेख करत शहा म्हणाले की, हे १३० कोटी भारतीयांचे ध्येय बनले पाहिजे. या ५ संकल्पांद्वारे २०४७ पर्यंत भारत जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल आणि त्या प्रवासात भाषांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

विकसित भारताचे स्वप्न


गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती

आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान

राष्ट्रीय एकता व अखंडतेबद्दल समर्पण

प्रत्येक नागरिकामध्ये कर्तव्यभावना

English Language : भारत समजून घेण्यासाठी इंग्रजी अपुरी


परदेशी भाषा भारत समजून घेण्यासाठी अपुरी आहे असं म्हणत अमित शाहांनी इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांवर टीका केली. परदेशी भाषा या भारताच्या इतिहास, संस्कृती आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यासाठी पुरेशा नाहीत असं अमित शाह म्हणाले. अर्धवट परदेशी भाषांद्वारे भारत कधीच समजला जाऊ शकत नाही. ही लढाई सोपी नाही, पण मला विश्वास आहे की आपण ती जिंकू. आपण आपल्या भाषांमध्ये देश चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू असा आत्मविश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट