हिंदी भाषेला पर्याय आम्ही दिला आहे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey)  यांनी पत्रकार परिषद घेत पहिली पासून हिंदी भाषा शिकण्यास सक्ती नको. अशी भूमिका मांडली असताना राज्यात भाषावाद आता पाहायाला मिळतोय. महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपली महत्वाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलाय. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये पहिलीपासून तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले होते. फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले. राज्य सरकारने हिंदी भाषा शिकण्यासाठी अनिवार्य केले होते. मात्र, आम्ही हिंदी भाषेला (Hindi Language) पर्याय दिलेला आहे.

राज्य सरकारने हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे ज्यांना जी भाषा आवडते ती तीसरी भाषा शिकू शकतात. त्यामुळे तिसऱ्या भाषेची सूत्रता नव्या शैक्षणिक धोरणात समाविष्ट केली आहे. शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागतील मात्र, मुलं स्वभाविकपणे इंग्रजी भाषा स्विकारतील. मात्र तिसरी भाषा म्हणून कुठल्याही भारतीय भाषेचा पर्याया स्विकारता येईल. अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली.

शिक्षकांची संख्या कमी असल्याने भाषा शिकवण्यासाठी उपस्थिती असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त काम करावं लागेलं अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेच्या शिक्षक उपलब्ध केला जाईल, अशी भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केली. तसेच हिंदी भाषेचे शिक्षक सहज उपलब्ध होतात.  २० विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार भाषा निवडली तर त्यांच्यासाठी शिक्षक उपलब्ध केला जाईल. त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल.  असे ही फडणवीस म्हणाले.

 
Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या