Vedanta Dividend: वेदांताकडून अंतरिम लाभांश जाहीर 'इतके' रूपये प्रति शेअर्स मिळणार

प्रतिनिधी: आज वेदांता लिमिटेड संचालक मंडळाच्या बैठकीत ७ रूपये प्रति समभाग (Share) एवढा अंतरिम लाभांश (Interim Dividend)निश्चित केला आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीची पडताळणी केल्यानंतर ७ रूपयांचा लाभांश (Dividend) निश्चित सुचवला. मागील आर्थिक वर्षात कंपनीने १७००० कोटींचा लाभांश (प्रति समभाग ४५ रूपये)आपल्या भागभांडवल धारकांना दिला होता. यावर्षी ७ रूपये लाभांश देण्यापूर्वी कंपनीने आपल्या हिंदुस्थान झिंक या कंपनीती ल ३०१८ कोटी मूल्यांकनाचे शेअर्स विकले आहेत. मागच्या वर्षी १.५१ समभाग ऑफर फॉर सेल (OFS) माध्यमातून विकले होते.


कंपनीने लाभांश देण्यासाठी नोंदणी तारीख (Record Date) २४ जून निश्चित केली आहे. समभाग ट्रेडिंग माध्यमातून अनिल अग्रवाल संचलित वेदांता कंपनीच्या संसाधनात होल्डिंगमध्ये ६५ टक्क्यांवरून आता ५६.३८ टक्क्यांवर घट झाली. यावर्षी कंपनीने ७ रूपये प्रति समभाग लाभांश दिल्यास कंपनीच्या पुजींतून जवळपास २७३७ कोटी निधीचे वाटप होणार आहे. मार्च तिमाहीच्या अखेरीस वेदांताचे जवळपास २० लाख किरकोळ भागधारक आहेत, किंवा ज्यांचे अधिकृत भागभांडवल २ लाखांपर्यंत आहे,ज्यांच्याकडे कंपनीचा ११.२५% हिस्सा आहे. तसेच यापूर्वी मागील आठवड्यात वेदांता समुहाची कंपनी हिंदुस्थान झिंक कंपनीने आपल्या भागभांडवल धारकांना १० रूपये प्रति समभागाची घोषणा केली होती.


काल माध्यमांच्या वृत्तानुसार, हिंदुस्तान झिंकचे प्रवर्तक (Promoter) वेदांत कंपनीतील आपला हिस्सा कमी करण्याचा विचार करत होते. सुरुवातीला करार ७,५०० कोटीचा होता.आज सकाळी, ब्लॉक डीलद्वारे ३,३२३ कोटी किमतीचे ७.२ कोटी शेअर्स ४६०.५ प्रति शेअर या दराने हस्तांतरित झाले आहेत. दुपारपर्यंत वेदांता लिमिटेड कंपनीच्या समभागात ०.९०% घसरण झाली होती तर हिंदुस्थान झिंक कंपनीच्या ६.९२% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं