​​PMRDA : ​​शिवाजीनगर ते हिंजवडी ​मेट्रो -३ला आणखी विलंब​!

गारेगार प्रवाससाठी वर्षभर थांबाच!


​आयटी अभियंत्यांना थंडगार व आरामदायी प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतिक्षाच करावी लागणार आहे. कारण हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाइन-३ ​चं काम सप्टेंबर २०२५ पर्यंत होणं अपेक्षित होतं. पण ते शक्य नाही. त्याला आणखी वर्षांचा कालावधी लागू शकतो. २३.३ किलोमीटर लांबीच्या ​या उन्नत मार्गिके​चं काम आता ​थेट मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता ​वर्तवली जात आहे.


?si=RzVzy3qFY2_n1b7F

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ​म्हणजे PMRDAकडून ​ सार्वजनिक-खासगी भागीदारी ​ म्हणजे पीपीपी मॉडेल​ तत्वावर ​हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ७,४२० कोटी रुपये खर्चा​च्या पुणे मेट्रो लाइन-३ चे काम २०१८ मध्ये मंजूर झाले​. मार्च २०२३ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. नंतर ही मुदत सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली, परंतु आता ती मार्च २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या विलंबा​चं प्रमुख कारण म्हणजे राजभवन परिसरातील २६३.७८ चौरस मीटर जमिनीचे हस्तांतरण​. तसेच विद्यापीठ चौकातील ​दुहेरी उड्डाण​पुलाचे अपूर्ण काम​. यामु​ळंही मेट्रो लाईन ३ च्या कामाला उशीर होत असल्याचा दावा केला जात आहे. ​मेट्रो लाईन ३ या प्रकल्पावर २३ स्थान​के असतील.



हा प्रकल्प पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडीच्या आयटी हबला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सध्या​ प्रकल्पा​चं ८३ ते ८५ टक्के काम पूर्ण झा​लयं. परंतु ​​ वीज आणि पाण्याच्या लाईन्स​ आणि काही स्थानकांवरील अंतिम कामे बाकी आहेत​, असंही सांगण्यात येतयं. मेट्रो लाईन ३ सुरू होण्यास आणखी एक वर्ष उशीर होत असल्यानं पुणेकरांमध्ये नाराजी पसरली आहे​. कारण​ सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास​ वाहतूक कोंडीमुळं वेळखाऊ ​होतोय. मात्र एकदा हा मार्ग कार्यान्वित झाला की, ​ पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडीच्या आयटी हबमधील ​अंतर ३० ते ४० मिनिटांवर येईल. तसेच या भागात ये-जा करणाऱ्यांचा प्रवास गारेगार व आरामदायी होईल.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या