सात तोळे सोन्याचे चोरी झालेले दागिने पोलिसांकडून परत

नेवासा : तालुक्यातील सौदाळा येथे तीन ठिकाणी चोरी करण्यात आली होती. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी तीन लाख ३९ हजार रुपयांचे ७ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. त्या अनुषंगाने नेवासा पोलिसांनी तपास करून फिर्यादीस त्याचे चोरी झालेले दागिने पुन्हा मिळवून दिले आहेत.



याबाबत नेवासा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १५ जानेवारी रोजी सौंदाळा तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. स्वप्नाली बाबासाहेब गरड यांचे राहते घरी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन जबरदस्तीने तीन लाख ३९ हजार रुपयांचे ७ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच इतर दोन चोरींबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे स्वप्नाली गरड यांनी फिर्याद दाखल केली होती.

यात पुष्पा चामुटे यांचे घरी त्यांच्या दागिन्यांची चोरी झाली होती.सदर घटनेची पोलीस ठाणे नेवासा, पोलीस निरीक्षक, धनंजय जाधव यांनी तातडीने गांभीर्याने नोंद घेऊन तपास पथके नेमून अनोळखी आरोपींचा शोध सुरू केला होता. याच दिवशी संभाजीनगर शहरामध्ये देखील अशाच प्रकारे घरफोडी झाली होती व त्यामधील अनोळखी चोर हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. याची माहिती नेवासा पोलिसांना मिळताच सदरचे सीसीटीव्ही फुटेज पुद्ध पातळीवर प्राप्त करून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. सदरचे सीसीटीव्ही फुटेज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अहिल्यानगर यांना देखील शेअर करून आरोपींची ओळख पटवली असता आरोपी हे अत्यंत सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले, त्यांची नावे सचिन ईश्वर भोसले रा. बेलगाव ता. कर्जत व गाड्या उर्फ गाडेकर झरक्या चव्हाण रा. नागझरी ता. गेवराई जि. बीड येथील असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर येथील पथकाने सदरच्या आरोपींना अथक परिश्रमानंतर शिताफीने जेरबंद केले होते.

सदर आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आणखी पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली होती.नेवासा येथील गुन्ह्यात जे सोने जबरीने चोरून नेले होते ते परत मिळवण्यासाठी यातील फिर्यादी स्वप्नाली आरगडे यांनी नेवासा न्यायालयात विनंती अर्ज केला होता. न्यायालयाने याबाबत नेवासा पोलिसांचे म्हणणे मागितले होते.नेवासा पोलिसांनी फिर्यादीस सोन्याचे दागिने परत करण्याबाबतचा सकारात्मक अहवाल दिल्यानंतर फिर्यादीचे जबरीने चोरून नेलेले सोन्याचे दागिने फिर्यादीस परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याप्रमाणे सदरचे सोन्याचे दागिने आज रोजी पुष्पा चामुटे रा. सौंदाळा तालुका नेवासा यांना परत केले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हवालदार अजय साठे, पो. कॉ. नारायण डमाळे, आप्पा तांबे, अमोल साळवे, अंबादास जाधव यांनी चोखपणे केला.
Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना