पिसवली ग्रामस्थांची होणार डम्पिंगच्या दुर्गंधीतून मुक्तता

कल्याण : पिसवली परिसरातील नागरिकांची डम्पिंगच्या दुर्गंधीपासून मुक्तता होणार असून पिसवली देशमुख होम्स परिसरातील कचरा हटविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत होते. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन डम्पिंग ग्राउडच्या जागेचे बगीच्यात रूपांतरण करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.


रस्त्याच्या कडेला सातत्याने कचरा फेकला जात असल्याने पिसवली आणि देशमुख होम्स दरम्यानच्या सुंदर जागेचे भराव भूमीत रुपांतर होत असल्याची बाब कळताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तत्काळ या जागेची पाहणी करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यानंतर हा परिसर स्वखर्चाने स्वच्छ करणार असल्याचे जाहीर केले. तसेच भविष्यात या जागेचे पुन्हा कचरा कुंडीत रुपांतर होऊ नये यासाठी या ठिकाणी वृक्षारोपण करत या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले. तसेच या भूखंडालगत असलेल्या स्मशानभूमीत देखील नागरिकांच्या सोयीसाठी बाकडी बसवून या स्मशान भूमीच्या परिसराचे सुशोभिकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या पिसवली आणि देशमुख होम्स परिसराच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जात असल्याच्या तक्रारी आमदार राजेश मोरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत या परिसराचा आमदार मोरे यांनी दोन दिवसापूर्वी पाहणी दौरा केला. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देत या परिसरातील कचऱ्याच्या स्वच्छता स्वखर्चाने सुरु केली. तसेच या परिसरात कचरा टाकून या परिसराचे सौंदर्य नष्ट करू नका असे आवाहन परिसरातील नागरिकांना करताना या जागेत लवकरच वृक्षारोपण करत परिसर सुंदर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या भूखंडालगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून स्मशान भूमीची देखील डागडुजी करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून