Paytm Money: पेटीएम मनीकडून F&O ट्रेडर्ससाठी प्रगत साधनांची घोषणा 

मुंबई: तंत्रज्ञानाधिष्ठित दृष्टिकोनातून संपत्ती व्यवस्थापन व इक्विटी गुंतवणूक सुलभ करणा-या फिनटेक कंपनी पेटीएम मनीने रिटेल फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F &O) ट्रेडर्ससाठी प्रगत ट्रेडिंग टूल्सचे सादरीकरण केले आहे. नवीन वैशिष्ट्यांमध्ये ऑप्शन्स स्कॅलपर, चार्टवरून थेट ट्रेडिंग (चार्टआयक्यूद्वारे समर्थित), ऑप्शन चेनमधून बास्केट ऑर्डर, फक्त ९.७५% व्याजदराने पे लेटर (MTF), आणि ट्रेडिंग आयडिया (Trending Idea) हे पेटीएम मनी सेबी-नोंदणीकृत संशोधन विश्ले षक असल्यामुळे आता शक्य झाले आहे असे कंपनीने म्हटले. हे सगळे टूल्स सर्व पातळीच्या ट्रेडर्ससाठी सोयीस्कर आणि सुलभ इंटरफेसद्वारे (Good Interface)उपलब्ध आहेत.


याविषयी बोलताना पेटीएम मनी (Paytm Money) प्रवक्ते म्हणाले, 'आमचे उद्दिष्ट प्रत्येक गुंतवणूकदाराला आणि व्यापार्‍याला सर्वोत्तम तंत्रज्ञान, माहिती व टूल्स प्रदान करणे आहे. हे नवीन फीचर्स सक्रिय ट्रेडर्ससाठीच बनवले आहेत. एफ अँड ओ बाजारातील वाढती रिटेल भागीदारी पाहता, पेटीएम मनी या क्षेत्रात आघाडीवर आहे. या सर्व सुविधा पेटीएम मनीच्या अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅपच्या नवीनतम आवृत्तीत एफ अँड ओ विभागात एफ अँड ओ अ‍ॅक्टिवेशन आणि धोके प्रकटीकरण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध आहेत.'


टूल्सची प्रमुख वैशिष्ट्ये:


ऑप्शन्स स्कॅलपर: ही पहिल्यांदाच सादर करण्यात आलेली अंमलबजावणी टूल आहे, जे एकाच वेळी ऑप्शन चार्ट आणि मूळ स्टॉक दाखवते. व्यापारी पूर्वनिर्धारित ऑर्डर आकार आणि प्रकार सेट करू शकतात आणि एका टॅपवर व्यवहार पूर्ण करू शकतात.


चार्टवरून ट्रेडिंग: चार्टआयक्यूद्वारे समर्थित हे फीचर वापरकर्त्यांना चार्टवरून थेट ऑर्डर देण्याची परवानगी देते. स्लायडरद्वारे किंमत सेट करून ऑर्डर एक्सचेंजकडे पाठवले जाते. हे इंट्राडे आणि डिलिव्हरी ऑर्डरसाठी लागू आहे.


ऑप्शन चेनमधून बास्केट ऑर्डर: स्ट्राइक प्राईस निवडून व्यापारी बास्केट तयार करू शकतात व पुन्हा वापरू शकतात. हे अनेक स्क्रीनवर जाण्याची गरज कमी करते आणि वेळ वाचवते.


ट्रेडिंग आयडिया: सेबी नोंदणीकृत विश्लेषकांच्या तज्ञ मार्गदर्शनावर आधारित विचार आणि धोरणे, सर्व पेटीएम मनी वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत.


९.७५% दराने पे लेटर: सक्रिय व्यापार्‍यांसाठी ९.७५% या कमी दराने पे लेटर (मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Tuljabhavani VIP Darshan: तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग!

सोलापूर: शारदीय नवरात्रोत्सव (Navratri 2025) अवघ्या १० दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

गोवा वन खात्याचे पथक सिंधुदुर्ग सीमेवर सतर्क ओंकार हत्ती आज दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा