नांदेडच्या भक्ताकडून माउलींना 1 कोटी सोन्याचा मुकुट अर्पण

  117

पुणे: आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिरात नांदेड येथील भक्ताकडून एक कोटी रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. या सोन्याचे वजन तब्बल एक किलो आहे. चार महिन्यांच्या अथक परिश्रमातून हा मुकुट तयार केला गेला असल्याची माहिती आहे.

भारत रामिनवार आणि मीरा रामिनवार यांनी हा सोन्याचा अलंकारिक मुकुट माऊलींना अर्पण केला. हा मुकुट तयार करण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागला असल्याचे बोलले जात आहे, यामध्ये पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

वारकरी परंपरेशी नाते असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभावाने घडवला. मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण इत्यादी मंगल प्रतीके पाहायला मिळतात. हा मुकुट मंगळवारी (दि. १७) माउलींना अर्पण करण्यात आला.
Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ