'मेट्रो १ मार्गिकेवर आठ फेऱ्यांत वाढ

मुंबई : 'मेट्रो १' च्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मार्गिकेवरील गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. 'मेट्रो १' वर सोमवारपासून प्रतिदिन आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून आता एकूण फेऱ्यांची संख्या ४४४ वरून ४५२ झाली आहे. मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


२०१४ मध्ये 'घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १' मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाली. आता या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत असून 'मेट्रो १' मधून प्रतिदिन पाच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत मात्र वाढ झाली नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. 'मेट्रो १' मार्गिकेवर दर ३ मिनिटे आणि २५ सेकंदाने एक गाडी सुटत होती. आता मात्र दर ३ मिनिटे २० सेकेंदाने गाडी धावणार आहे. एकूणच गाड्यांची संख्या वाढल्याने आता प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य