भारतीय अंतराळवीर २२ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना होणार

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४ मिशन २२ जून रोजी रवाना होणार आहे. याआधी वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे मागील काही दिवसांत ही मोहीम वारंवार पुढे ढकलली जात होती. आधी प्रतिकूल हवामानामुळे, नंतर यानातील वायू गळती सुरू झाल्याचे लक्षात आल्यामुळे मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.

मोहीम सुरळीत आणि सुरक्षितरित्या व्हावी यासाठी खबरदारी घेतली जात आहे. किरकोळ चूक नंतर जीवघेणी ठरू शकते. यामुळेच तांत्रिक दोष लक्षात येताच ते दूर करण्यासाठी मोहीम काही काळ पुढे ढकलली होती. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि अ‍ॅक्सिओम-४ मिशन २२ जून रोजी रवाना होईल, असे या मोहिमेशी संबंधित असलेल्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले.

अ‍ॅक्सिओम-४ मिशनमध्ये भारताचे शुभांशू शुक्ला तसेच पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अ‍ॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या