मुसळधार पावसात टिटवाळ्यातील बेकायदा चाळी जमीनदोस्त

कल्याण : बेकायदा चाळींचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा, मांडा, बल्याणी, वासुंद्री, उंभार्णी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून दररोज बेकायदा चाळी, व्यापारी गाळे, जोत्यांवर तोडकामाची कारवाई सुरू आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सुमारे अडीच ते तीन हजार बेकायदा बांधकामे भुईसपाट केली आहेत. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. या सततच्या कारवाईने भुमाफियांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांमुळे एका साहाय्यक आयुक्ताला सहा महिन्यापूर्वी निलंबित व्हावे लागले.


प्रमोद पाटील यांनी अ प्रभाग साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून दररोज तोडकामाची मोहीम सुरू ठेऊन टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामांची श्रृंखला पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या आठवड्यात टिटवाळा भागातील वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंभार्णी भागात मुसळधार पावसात बेकायदा चाळी उभारणीची कामे सुरू आहेत. याच भागात नवीन चाळी उभारणीसाठी नवीन जोत्यांची उभारणी आणि त्यात मातीचे भराव केले जात आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त पाटील यांना वरिष्ठांकडून मिळाली. या माहितीची खात्री केल्यानंतर वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंभार्णी येथे नव्याने बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे पाऊस सुरू असताना जेसीबी आणि घणांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.


या बांधकामांची उभारणी कोणी केली आहे याची माहिती परिसरातून घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, पण कोणीही रहिवासी याबाबतची माहिती देण्यासाठी पुढे आला नाही. बांधकामांच्या ठिकाणचे मजूर, गवंडी कामाच्या ठिकाणाहून पळून गेले होते. कामाच्या ठिकाणचे सिमेंट, ग्रीट मातीत मिसळून या साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून