Maruti Chittampalli Passes Away: जंगल प्रत्यक्ष जगलेला माणूस काळाच्या पडद्याआड

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं 93 व्या वर्षी निधन


अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले, ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मारुती चित्तमपल्ली हे मराठी वन्यजीव अभ्यासक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते.  जंगल प्रत्यक्ष जगणाऱ्या या व्यक्तिमत्वाने वनाधिकारी म्हणून तब्बल ३६ वर्षे नोकरी केली. निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक वर्ष जंगलात काढली. यादरम्यान जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे टिपत त्यासंबंधित त्यांनी अनेक लेखनी देखील केल्या. त्यांना वन्यजीव संवर्धन, साहित्य आणि शिक्षणातील त्यांच्या असाधारण योगदानासाठी "अरण्य ऋषी" - वनऋषी म्हणून ओळखले जात होते. असे हे थोर व्यक्तिमत्व आज अनंतात विलीन झाले.


मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद) चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते.  त्यांच्या या एकंदरीत कारकिर्दीची दखल घेत त्यांना यावर्षी दिनांक १८ एप्रिल, २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक अशी त्यांना ओळख मिळाली.  त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. रानवाटा, जंगलाची दुनिया, निळावंती, निसर्गवाचन, पक्षिकोश यांसारख्या गाजलेल्या पुस्तकांचा यात समावेश आहे.



सुरुवातीचे जीवन आणि बालपण


मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव मारुती भुजंगराव चितमपल्ली असे आहे. त्यांच्या आईच्या निसर्गावरील प्रेमाने प्रेरित होऊन, चितमपल्ली यांना जंगलाबद्दलचे आकर्षण निर्माण झाले. त्यांनी १९५८ मध्ये कोइम्बतूर येथील राज्य वन सेवा महाविद्यालयात औपचारिक प्रशिक्षण घेतले, वन संवर्धनातील त्यांच्या आयुष्यभराच्या प्रवासाचा पाया येथेच रचला गेला.


Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई