FASTag Annual Pass 2025 : फक्त ३ हजारमध्ये वर्षभर टोलमुक्त प्रवास! गडकरींची घोषणा

आगामी १५ ऑगस्टपासून देशभरात राबवणार योजना


नवी दिल्ली : केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे FASTag बद्धलची घोषणा केली. वाहनचालकांसाठी लवकरच फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू होणार आहे. या नव्या योजनेंतर्गत वाहनधारकांना ३ हजार रुपयात वर्षभर (२०० ट्रीप) टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. आगामी १५ ऑगस्ट २०२५ पासून ही योजना लागू होईल.


गडकरींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार आगामी १५ ऑगस्टपासून सुरू होणारी ही पास केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० फेऱ्या पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल) वैध राहील. वार्षिक पासमुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून सहज आणि किफायतशीर प्रवास करता येईल, असे गडकरींनी म्हंटले आहे.





नवीन धोरण


"नवीन धोरण ६० किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोलनाक्यांसंदर्भातील जुन्या समस्यांचे निराकरण करते आणि एकाच, परवडणाऱ्या व्यवहाराद्वारे टोल भरणे सुलभ करते. टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहन मालकांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणे, हा या वार्षिक पासचा उद्देश असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. इच्छुकांना 'राजमार्ग यात्रा' या अधिकृत अ‍ॅपद्वारे हा पास अ‍ॅक्टिवेट करू शकतील. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.



FASTag पासची वैशिष्ट्ये काय?



  • किंमत : ३ हजार रूपये

  • वैधता : सक्रियतेच्या तारखेपासून एक वर्ष किंवा २०० ट्रिप्स (जे आधी संपेल)

  • सुरुवात तारीख : १५ ऑगस्ट २०२५


पात्र?



  • ही योजना फक्त खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध असणार.

  • पास एकदा सक्रिय केल्यावर तो एक वर्ष किंवा २०० प्रवासांपर्यंत, यापैकी जे आधी संपेल, तेवढ्यासाठीच वैध असेल.


पास कसा काढायचा ?



  • वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी एक स्वतंत्र लिंक लवकरच हायवे ट्रॅव्हल ॲप आणि NHAI/MoRTH वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.

  • नागरिक ही लिंक सुरू झाल्यानंतर या अधिकृत ॲपद्वारे हा पास अ‍ॅक्टिवेट करू शकतील.

  • तसेच NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.

Comments
Add Comment

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर