मोठी बातमी: एलोन मस्क यांची 'Starlink' चा मार्ग मोकळा त्यांचा परवाना मंजूर ज्योतिरादित्य सिंधीयाची एक्सवर पुष्टी....

  61

प्रतिनिधी: अखेर एलोन मस्क (Elon Musk) यांच्या स्टारलिंक (Starlink) कंपनीला भारतात सरकारकडून मान्यता दिल्याचे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज स्पष्ट केले आहे. इंटरनेट कंपनी स्टारलिंकला भारतात परवाना मिळाला आहे. त्यामुळे आता गावोगावी हाय स्पीड इंटरनेट (High Speed Internet) मिळणार आहे. ही नावीन्यपूर्ण टेक्नॉलॉजी लो अर्थ ऑर्बिट (Low Earth Orbit) वर आधारित आहे. यासंबंधीच्या घडामोडीची घोषणा सिंधिया यांनी 'एक्स' वर दिली आहे.

त्यांनी सोशल मिडियावर ही आता ' Next Frontier Technology ' ची नांदी आहे. त्यामुळे ही मोठी सुरूवात आहे 'असे म्हटले. जिओ (Jio), एअरटेल (Airtel) यांनी यापूर्वी स्पेसएक्सशी मार्च मध्ये हातमिळवणी केली होती. त्यामुळे ग्राह कांना आता उच्च दर्जात्मक इंटरनेट सुविधा मिळू शकेल. स्टारलिंक ही सॅटेलाईट (उपग्रह) वर आधारित सुविधा आहे. ही सुविधा स्पेसएक्स ही एलोन मस्क यांची कंपनी देते. २००२ मध्ये कंपनीची स्थापना मस्क यांनी केली होती. ब्रॉडबँड जगतात आधुनिकीकरण करण्यासाठी या कंपनीने रिसर्च करून अखेर या तंत्रज्ञानाची सुरूवात केली आहे. ही टेक्नॉलॉजी Low Latency वर आधारित आहे. पृथ्वीपासून अंदाजे ५५० किलोमीटरवर असलेल्या सॅटेलाईटवर ही टेक्नॉलॉजी आधारित आहे. यामुळे भारतातील मुख्य टेलिकॉम व इंटरनेट कंपन्यांमध्ये स्पेक्ट्रम वाटपासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचेला मोठ्या प्रमाणात आळा घातला येणार आहे.



'स्पेसएक्सचे अध्यक्ष आणि मुख्य ऑपरेशन्स अधिकारी (COO) Gwyne Shotwell यांच्याशी आज भेट झाली. कनेक्टिव्हिटीमध्ये भारताला पुढील आघाडीवर नेत आहोत डिजिटल इंडियाच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि देशभरातील प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी आम्ही उपग्रह संप्रेषणात सहकार्याच्या संधींचा शोध घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या डिजिटल क्रांतीमुळे,उपग्रह तंत्रज्ञान केवळ प्रासंगिक नाही तर ते परिवर्तन कारी आहे. सुश्री शॉटवेल यांनी स्टारलिंकला देण्यात आलेल्या परवान्याचे कौतुक केले आणि ही प्रवासाची एक उत्तम सुरुवात असे असे त्यांनी एक्सवर लिहिताना सिंधिया यांनी यावेळी एक्सवर म्हटले आहे.

यापूर्वी युटेलसॅट वनवेब आणि जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन्स नंतर स्टारलिंक ही तिसरी कंपनी (Third Party Company)आहे. देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून परवाना कंपनीला मिळाला आहे. चौथा अर्जदार,अमेझॉनचा कुइपर अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे अजून त्यांना परवाना मिळाला नाही तो मिळाल्यास इंटरनेट क्षेत्रात स्पर्धा एका नवीन पातळीवर जाऊ शकते.
Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात