Astrology: जूनच्या अखेरीस होणार मंगळ-शुक्रची युती, या राशींना मिळणार शुभ लाभ

मुंबई: जूनच्या अखेरीस शुक्र मंगळच्या युतीमुळे धनशक्ती राजयोग बनत आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र मंगळ युती असणे हे अतिशय शुभदायी मानले जाते. शुक्र ग्रहाला सुख-समृद्धी, प्रेम आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. तर मंगळ ग्रहाला सर्व ग्रहांचा सेनापती म्हणून पाहिले जाते. शुक्र मंगळाच्या युतीने धनशक्ती राजयोग निर्माण होत आहे. कारण दोन्ही ग्रह एकमेकांच्या धन आणि लाभ भावात विराजमान आहेत.


जाणून घेऊया शुक्र आणि मंगळच्या युतीने बनत असलेला धनशक्ती राजयोग कोणत्या राशीसाठी लाभदायक असणार आहे.



मिथुन


धनशक्ती राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर असणार आहे. नव्या लोकांशी भेटीगाठी फलदायी ठरतील. बिझनेसमध्ये मोठा फायदा होईल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील.


मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. शत्रूंपासून सुटका मिळेल. सोबतच समाजात मान-सन्मान प्राप्त होईल.



कर्क


धनशक्ती राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठीही धनलाभाची शक्यता दर्शवतो. आर्थिक स्थिती चांगली होईल. पैसे कमावण्याचे नवे मार्ग उघडतील. अनेक प्रॉपर्टीही खरेदी करू शकता.



वृश्चिक


धनशक्ती राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अतिशय चांगला मानला जात आहे. कामामुळे परदेश प्रवास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या शत्रूंवर भारी पडाल. सोबतच कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांची साथ मिळेल.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण