Israel Iran War : अमेरिकेने पाठवली थेट ३० लढाऊ विमाने, इराण इस्राईल युद्ध चिघळण्याची शक्यता

तेहरान : इस्रायल आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस धोकादायक होत चाललं आहे. गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात, दोन्ही देश एकमेकांवर सतत क्षेपणास्त्रे हल्ले करत आहे.अशातच आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्राइल विरोधात युद्दाची घोषणा केली आहे. या सर्व घडामोडीवर, अमेरिकेने ३० लढाऊ विमानं रवाना केली असून इराणने बिनशर्त शरणागती स्वीकारावी, असा सल्ला दिला आहे. यामुळे आता इस्राइल आणि इराणमधील संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

इस्रायल आणि इराणमधील संघर्षादरम्यान, मागच्या ३ दिवसांमध्ये अमेरिकेची किमान ३० लढाऊ विमानं ही अमेरिकेच्या विविध तळांवरून युरोपमध्ये पाठवण्यात आली आहेत. ही सर्व विमाने सैन्यदलांमधील टँकर विमानं आहेत. ज्यांचा वापर लढाऊ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी होतो.



या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना बिनशर्त शरणागती स्वीकारण्यास सांगितले होते. "इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी कुठे लपले आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण सध्या तरी त्यांना ठार मारायची इच्छा नाही," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तसेच , इराणमध्ये नागरी वस्त्यांवर आम्हाला हल्ले करायची इच्छा नाही. मात्र आमचा संयम आता संपत चालला आहे, ही गोष्टही खरी आहे. इराणने अणुकरार करणे आवश्यक होते. त्यांना तशी विनंतीही मी केली होती. मात्र इराणने ते मान्य केले नाही. आता चर्चा करावी असे वाटत नाही, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी केराची टोपली दाखवली आहे. तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांची इस्त्राइलने हत्या केल्यानंतरही युद्ध कायम ठेवण्याचा इशारा इराणने दिला आहे.इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी (दि. १८) एक्स पोस्ट करत युद्धाची घोषणा केली आहे..अली खामेनी यांनी आपले अधिकार इराणी सैन्याकडे सोपवले आहेत. खामेनी यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ईशान्य तेहरानमधील एका भूमिगत बंकरमध्ये हलवण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

अयातुल्ला अली खामेनी यांनी आधी "महान हैदरच्या नावाने, युद्ध सुरू झाले आहे," अशी पोस्ट केली. त्यानंतर काही वेळातच, खामेनींनी इस्रायलला इशारा देत, "आता दहशतवादी झिओनिस्ट राजवटीला कडक प्रत्युत्तर दिले पाहिजे. आम्ही त्यांच्याबाबतीत आता कोणतीही दया दाखवणार नाही," असं म्हटलं. या घोषणेनंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली.
Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या