Iran Israel War : अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला; थेट तेल डेपोला भीषण आग! आकाशात धुराचे आगीचे लोट

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला सुरूच आहे. इराणही या हल्ल्यांना चोख उत्तर देत आहे. अशातच आता अमेरिकेने इराणवर सर्वात मोठा हल्ला केला आहे.


शनिवार ७ मार्च रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मध्यरात्री मोठा हल्ला करणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर अमेरिका आणि इस्त्रायलकडून अत्यंत घातक हल्ला इराणवर करण्यात आला. अमेरिकेने तेहरानमध्ये हा सर्वात मोठा हल्ला केला.



अमेरिकेकडून थेट तेल डेपोवर हल्ला :


इराणची राजधानी तेहरानवर अमेरिकेकडून बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने मेहराबाद विमानतळाला बॉम्ब हल्ले केले. विमानाच्या इंधन डेपोवरही हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर मोठा धमका झाला. इराणच्या तेहरानमध्ये अमेरिकेने थेट तेल डेपोवर हल्ला करत आग लावली. यानंतर आकाशात धूर पसरला. आग मोठी भडकली आणि फक्त धूरच दिसत होता.





इराणचे मोठे नुकसान :


अमेरिकेने केलेल्या या इंधन डेपोवरील हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. तेहरान शहर अमेरिका आणि इस्त्रायलच्या सुरूवातीपासूनच निशाण्यावर आहे. त्यामध्येच आता थेट हल्ले करण्यात आला आहे. आता या हल्ल्याला इराण कसं उत्तर देईल याची कल्पना करणं कठीण आहे.



इराण आपल्या भूमिकेवर ठाम :


सतत इतके मोठे हल्ले होत असतानाही इराण हार मानत नाही आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत शरणागती स्वीकारणार नाही असे इराणने स्पष्ट सांगितले आहे.
Comments
Add Comment

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी